शरद पवारांचा खोटा दाखला कोणी व्हायरल केला? रोहित पवारांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 12:31 PM2023-11-13T12:31:39+5:302023-11-13T12:32:02+5:30

काल खासदार शरद पवार यांचा खोटा जातीचा दाखला व्हायरल झाल्याचे समोर आले होते.

Who made Sharad Pawar's false certificate viral? Serious accusation of Rohit Pawar | शरद पवारांचा खोटा दाखला कोणी व्हायरल केला? रोहित पवारांचा गंभीर आरोप

शरद पवारांचा खोटा दाखला कोणी व्हायरल केला? रोहित पवारांचा गंभीर आरोप

मुंबई- राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजातून ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध सुरू आहे. आरक्षणावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू आहे. गेल्या काही दिवासांपूर्वी खासदार शरद पवार यांचा ओबीसी दाखला असल्याचा दावा करण्यात येत होता, सोशल मीडियावर पवारांचा दाखला व्हायरल झाल्याने खळब उडाली होती. दरम्यान, आता खासदार सुप्रिया सुळे यांनी हा दाखला खोटा असल्याचा दावा केला आहे. यावर आमदार रोहित पवार यांनीही भाजपवर आरोप केला आहे.

“झोमॅटो असो वा स्विगी असो, आमच्या पक्षाची प्रतिज्ञापत्र...”; अजितदादा गटाचे नेते थेट बोलले

आमदार रोहित पवार म्हणाले, भाजपची ती प्रथा आहे, भाजपला सत्य कधी समजत नाही. त्यांना खोट्या गोष्टी कळत असतात. भाजपचे जे पैसे घेऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत, टोल आर्मी आपण त्याला म्हणतो प्रत्येक कमेंटला तीन रुपये आणि प्रत्येक लाईकला दहा पैसे अशावर काम करणाऱ्या लोकांनी हा दाखला बदलून व्हायरल केला, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला. भाजप हे सत्तेसाठी लढतंय, आम्ही सत्यसाठी लढतोय. सत्य आम्हाला माहित आहे. असत्याची बाजू घेऊन भाजपला सत्तेत यायच आहे. त्यामुळे लोकांच नुकसान झालं तरी त्यांना फरक पडत नाही. जसे भाजपचे नेते विचार करतात तसे कार्यकर्तेही विचार करतात कार्यकर्त्यांनी तो दाखला बदलून व्हायरल केल्याचे यात दिसत आहे, असा आरोपही रोहित पवार यांनी केला. 

दाखला खोटा असल्याचा सुप्रिया सुळेंचा दावा

मराठा आरक्षणाचा तसेच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मुद्दा तापलेला असतानाच रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ‘ओबीसी’ उल्लेख असलेला दाखला सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, हा दाखला खोटा असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. पुरावा म्हणून शरद पवारांचा शाळा सोडल्याचा दाखला राष्ट्रवादीने समोर आणला असून या दाखल्यावर ‘मराठा’ असाच उल्लेख आहे. याबाबत खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, व्हायरल होत असलेला दाखला इंग्रजीत आहे. खोडसाळपणा करण्यासाठी असे प्रकार होत आहेत.  

बावनकुळेंचे कानावर हात

आम्ही कशाला खोटी प्रमाणपत्रे व्हायरल करू, ती राष्ट्रवादीची परंपरा आहे, आम्ही राष्ट्रीय कामामध्ये गुंतलो आहोत, असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

Web Title: Who made Sharad Pawar's false certificate viral? Serious accusation of Rohit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.