राहुल वाडेकर, तलवाडाआदिवासी दुर्गम भागाचा विकास साधावयाचा असल्यामुळे विस्तीर्ण ठाणे जिल्हयाचे विभाजन केले आहे. जव्हार, विक्रमगड, मोखाडा हे ठाणे जिल्हयांतील अतिदुर्गम आदिवासी तालुके असताना जव्हारऐवजी पालघर जिल्हा झाल्याने जिल्हा नक्की कोणासाठी? असा प्रश्न आदिवासी बांधव उपस्थित करत आहेत.जव्हार, विक्रमगड, मोखाडा या तालुक्यात रोजगार, दळणवळण, निवारा, बेकारी, दारिद्रय, कुपोषण, भूकबळी असे अनेक प्रश्नही आजही जैसे थे आहेत. वारंवारच्या मागणीनंतर जव्हारला उपजिल्हयाचा दर्जा देण्यात आला खरा मात्र जिल्हा व मुख्यालय जव्हार होण्याची वेळ आली असताना केवळ अधिका-यांच्या सोईसाठी पालघर तालुक्याला प्राधान्य देण्यात आल्याने या महत्त्वाच्या निर्णयात आदिवासी बांधवांना सहभागी करुन घेण्यात आले नसल्याचा त्यांचा आक्षेप आहे.पिंगुळकर व कोकण समितीने ग्रामीण तालुक्यांचा दौरा करुन अहवाल सादर केला, पण तो फक्त अधिका-यांचा अहवाल व त्यांची सोय लक्षात घेऊन सादर केला. त्यामध्ये जनतेचे मतच मांडलेले नसल्याने ज्या कारणाकरिता विभाजन केले तो मुद्दाच बाजूला सारला गेला आहे. पालघर हे एक विकसित शहर असून या तालुक्यांत अनेकविध सुविधा अगोदरपासूनच आहेत. विभाजनाचा मूळ उददेश अविकसित तालुक्यांचा विकास असताना, त्यानुषंगाने विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागातील आदिवासींवर पालघर जिल्हा व मुख्यालय घोषीत करुन अन्यायच झाल्याचा आरोप आदिवासी जनतेकडून होत आहे.बिगर आदिवासीच जास्तठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा नवा जिल्हा आदिवासी भागाच्या विकासासाठी उदयास आला आहे, परंतू या नव्या पालघर जिल्ह्यात ज्या आदिवासी लोकांचा विकास होणार आहे, त्यात आदिवासींपेक्षा बिगर आदिवासी लोकांची संख्या जास्तच राहील. नव्या आदिवासी जिल्हयाची लोकसंख्या जास्त असेल, याचाही विचार होणे गरजेचे होते.विक्रमगड, जव्हार, मोखाडा व तलासरी या तालुक्यांना पालघर जिल्हा हा गैरसोयींचाच ठरणार आहे़ पण त्यांचा विचार करणारा वाली त्यांना मिळालेला नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल, पालघरपेक्षा ठाणेच बरे अशी प्रतिक्रियाही काहींनी दिली. (वार्ताहर
नवा जिल्हा कोणासाठी?
By admin | Published: June 23, 2014 2:49 AM