जुन्या ठाण्याचा ठाणेदार कोण?

By admin | Published: January 8, 2017 02:43 AM2017-01-08T02:43:30+5:302017-01-08T02:43:30+5:30

जुन्या ठाण्याचा ठाणेदार आतापर्यंत शिवसेना पक्ष होता. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे संजय केळकर या ठिकाणाहून विजयी झाल्याने राजकीय समीकरणे बदलली.

Who is the oldest Thane station? | जुन्या ठाण्याचा ठाणेदार कोण?

जुन्या ठाण्याचा ठाणेदार कोण?

Next

- अजित मांडके,  ठाणे
जुन्या ठाण्याचा ठाणेदार आतापर्यंत शिवसेना पक्ष होता. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे संजय केळकर या ठिकाणाहून विजयी झाल्याने राजकीय समीकरणे बदलली. येत्या महापालिका निवडणुकीत या भागातील २० जागांवर वरचष्मा राखणे भाजपाला शक्य होणार की, शिवसेना पुन्हा जुने ठाणे काबीज करणार, याबाबत राजकीय वर्तुळात औत्सुक्य आहे.
विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे भाजपाने बाजी मारली असली तरी मागील महापालिका निवडणुकीत
येथील प्रभागांमध्ये शिवसेनेचा पगडा आहे. आता प्रभागांची रचना बदलल्याने जुनी समीकरणे बरीच विस्कळीत झाली आहेत. या विधानसभा क्षेत्रात खऱ्या अर्थाने शिवसेना विरुद्ध भाजपा अशीच लढत पाहावयास मिळणार आहे.
ठाणे विधानसभा मतदारसंघात म्हणजे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात विधानसभा निवडणुकीत मागील कित्येक वर्षांनंतर कमळ फुलले. ठाण्यात भाजपाला स्वबळाचे धुमारे फुटण्याचे कारण हेच यश आहे. या मतदारसंघात भाजपाचे संजय केळकर यांनी सेनेच्या रवींद्र फाटक यांचा तब्बल १२ हजार मतांनी पराभव केला. या निवडणुकीत इतर पक्षांतील उमेदवारांना तगडी लढत देता आली नव्हती. राबोडीसारख्या मुस्लिमबहुल भागातही केळकर यांनी चांगली आघाडी घेतली होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला तेथे फारशी मते खेचता आली नाहीत. तर, मनसेलादेखील काहीच चमत्कार दाखवता आला नव्हता.
आता ठाणे महापालिका निवडणुकीत या मतदारसंघात सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना या दोन मित्रपक्षांतच लढत होण्याची शक्यता आहे. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील नौपाडा परिसरात शिवसेनेपेक्षा भाजपा ७५०० मतांहून पुढे होती. सध्या या मतदारसंघात एकूण ३० वॉर्ड येतात. आजघडीला यातील बहुतांश ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. भाजपा आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन नगरसेवक या मतदारसंघातून २०१२ च्या निवडणुकीत निवडून आले होते. त्या वेळेस जागावाटपात भाजपाच्या वाट्याला कमी जागा आल्या होत्या. परंतु, आता विधानसभेचे यश पाहता युती झाल्यास भाजपा समसमान जागा मागणार, हे उघड आहे. मात्र, युुतीची शक्यता धूसर असून भाजपासमोर विधानसभेचे यश टिकवण्याचे आव्हान आहे, तर शिवसेनेसमोर आपला बालेकिल्ला परत मिळवण्याचे आव्हान आहे. बाळकुम हा राष्ट्रवादीचा गड आहे. मात्र, राबोडीतील मुस्लिम मतदार विधानसभा निवडणुकीप्रमाणे या वेळीही भाजपाच्या मागे उभा राहणार की, उमेदवार पाहून मते देणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. काँग्रेस आणि मनसेसाठी ठाणे शहरातील पेपर कठीणच जाणार आहे.
दरम्यान, आॅक्टोबर महिन्यात झालेल्या प्रभागरचनेनंतर येथील वॉर्ड कमी झाले आहेत. या बदललेल्या प्रभागरचनेचा फायदा कोणाला होणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. जुन्या ठाण्यातून २० नगरसेवक महापालिकेत निवडून जाणार आहेत. जुने ठाणे हा प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने शिवसेना-भाजपामध्ये ‘कांटे की टक्कर होईल’, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Who is the oldest Thane station?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.