मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणा-कोणाला स्थान?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 06:34 AM2019-05-30T06:34:03+5:302019-05-30T06:35:16+5:30

मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार, याविषयी उत्सुकता आहे.

Who is the place from Maharashtra? | मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणा-कोणाला स्थान?

मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणा-कोणाला स्थान?

Next

मुंबई : मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार, याविषयी उत्सुकता आहे. नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल व शिवसेनेचे उपनेते अरविंद सावंत हे उद्या मंत्रिपदाची शपथ घेतील.
याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाही मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील आठ मंत्री होते. त्यात भाजपचे ६, शिवसेनेचे एक आणि रिपब्लिकन पार्टीचे रामदास आठवले यांचा समावेश होता. आठवले यांना पुन्हा संधी मिळेल असे दिसते.
शिवसेनेला दोन मंत्रिपदे मिळाली, तर अरविंद सावंत यांच्याबरोबरच अनिल देसाई, विनायक राऊत यांची नावेही चर्चेत आहेत. डॉ. सुभाष भामरे आणि सुरेश प्रभू यांना पुन्हा संधी मिळणार का, याबाबत अजून अनिश्चितता आहे. शिवाय महाराष्टÑात येऊ घातलेली विधानसभा निवडणुका लक्षात घेता पूनम महाजन आणि डॉ. हीना गावित यांना संधी मिळू शकते. दुसऱ्या टप्प्यात सेनेच्या भावना गवळी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Who is the place from Maharashtra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.