‘कोण म्हणतो? मराठी माणूस माझ्या सोबत नाही’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 01:43 AM2019-04-20T01:43:14+5:302019-04-20T01:44:13+5:30

जनतेचा एक प्रतिनिधी म्हणून मी एखादे काम करतो.

Who says? Marathi man is not with me ' | ‘कोण म्हणतो? मराठी माणूस माझ्या सोबत नाही’

‘कोण म्हणतो? मराठी माणूस माझ्या सोबत नाही’

Next

मुंबई : जनतेचा एक प्रतिनिधी म्हणून मी एखादे काम करतो. किंवा एखाद्या समस्येसाठी आंदोलन करतो, तेव्हा ते काम किंवा आंदोलन करताना मी कधीही मराठी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय असा जातीय भेदभाव करत नाही. मी सर्वांसाठी काम करतो आणि मुंबईतील जनतासुद्धा हे जाणते, असे प्रतिपादन उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी केले. संजय निरुपम यांनी जोगेश्वरी (पूर्व) येथील बिंबिसार नगर ते त्रिपाठीनगर मार्गे शुक्रवारी प्रचाररथ फेरी काढली. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, माझे विरोधक माझ्यावर आरोप करतात की मी मराठीविरोधक आहे. मी मराठीद्वेष्टा नेता आहे. मराठी लोक मला साथ देत नाहीत. मी म्हणतो, कोण म्हणतो? मराठी माणूस माझ्या सोबत नाही.
महायुतीचे उमेदवार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा हे मालाड (पूर्व) कुरार येथे रविवारी सभा घेणार आहेत.

Web Title: Who says? Marathi man is not with me '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.