मुख्याध्यापकांची पदे स्वीकारायची कोणी? कमी शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे होत आहे शैक्षणिक नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 10:52 AM2023-04-13T10:52:37+5:302023-04-13T10:52:37+5:30

राज्यात २३ महापालिका आहेत. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरसारख्या अनेक शहरांमध्ये महापालिका शाळांची संख्याही मोठी आहे.

Who should accept the post of headmaster Students are suffering educational losses due to less teachers | मुख्याध्यापकांची पदे स्वीकारायची कोणी? कमी शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे होत आहे शैक्षणिक नुकसान

मुख्याध्यापकांची पदे स्वीकारायची कोणी? कमी शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे होत आहे शैक्षणिक नुकसान

googlenewsNext

मुंबई :

राज्यात २३ महापालिका आहेत. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरसारख्या अनेक शहरांमध्ये महापालिका शाळांची संख्याही मोठी आहे. रिक्त शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे म्हटले जाते.

संघटनांकडून मागणी कायम
केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक ही पदे सरळसेवेने भरण्याबाबत सरकारी निर्णय झाला आहे. ही पदेही रिक्त आहेत. राज्यात पाच वर्षांपासून शिक्षकभरती झाली नसून, शिक्षणाचा स्तर ढासळत आहेत. २०१७ मध्ये राबविण्यात आलेली भरती प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. परिणामी, रस्त्यावर उतरून, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हे पात्रताधारक बेरोजगार अनेकदा संताप व्यक्त करतात. त्यात आता रिक्त जागांची संख्या समोर आल्याने पुन्हा भरती प्रक्रियेच्या मागणीकडे पात्रताधारकांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

या शाळांमध्येही मुख्याध्यापक नाहीत
सध्या पालिकेच्या सर्व माध्यमांमध्ये सुमारे तीन लाख विद्यार्थी आहेत. मराठीच्या २८० शाळा, ३४ हजार विद्यार्थी तर १,५८६ शिक्षक आहेत. हिंदीच्या २२६ शाळा व ५७ हजार विद्यार्थी आणि २,४२७ शिक्षक आहेत. उर्दूच्या १९२ शाळा, ५८ हजार विद्यार्थी आणि २,०९७ शिक्षक आहेत. या शाळांमध्ये ४० हिंदी भाषिक शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्याची माहिती समोर आली आहे.

पदोन्नतीने भरणार
अनेक शिक्षक सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्या शिक्षकांना न्याय देण्यासाठी पदोन्नती प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे. यापूर्वीच संप आणि मार्चअखेरीसमुळे पदोन्नतीस विलंब झाला आहे. पुढील महिन्यात मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांच्या रिक्त जागा पदोन्नतीने भरण्यात येणार आहेत.

शिक्षकांचीही कमतरता
शहर, उपनगरात महापालिकेच्या सर्व माध्यमांत सुमारे १००० शिक्षकांची कमतरता आहे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक एका तुकडीला या प्रमाणानुसार तीस हजार विद्यार्थ्यांना शिक्षक नाही, याची ओरड पालकांकडून सातत्याने होत असते. परिणामी, या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी
शाळा
मराठी    २८० 
हिंदी    २२६ 
उर्दू     १९२

शिक्षक
१,५८६ 
मराठी
२,४२७ 
हिंदी
२,०९७
उर्दू 

विद्यार्थी
    मराठी    ३४,००० 
    हिंदी    ५७,०००
    उर्दू     ५८,०००

Web Title: Who should accept the post of headmaster Students are suffering educational losses due to less teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.