Join us

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड व्हावी? शरद पवारांच्या मोठ्या बहिणीने घेतलं 'या' मोठ्या नेत्याचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 4:06 PM

भाकरी फिरवावी लागते, ती फिरवली नाही की करपते, असं विधान काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी केलं होतं.

मुंबई-  भाकरी फिरवावी लागते, ती फिरवली नाही की करपते, असं विधान काही दिवसापूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं होतं. या विधानानंतर राज्यभरातून पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. शरद पवार यांनी निणर्यावर विचार करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींवर आज खासदार शरद पवार यांच्या मोठ्या बहिण सरोज पाटील यांची लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांनी मुलाखत घेतली. यावेळी पाटील यांनी शरद पवार यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा यावरही भाष्य केले आहे.    

सरोज पाटील म्हणाल्या, काल ही बातमी समजल्यानंतर माझ्यासाठी हा धक्काच होता. सुरुवातीला मला दु:ख वाटलं. पण, नंतर मी विचार केला कोणतीही संस्था टीकवायची असेल तर आपल्यानंतर तेथे सक्षम असे सेवक असायला हवेत. यासाठी निस्वार्थी माणसं असायला हवेतं. पुढची तीन वर्ष शरद पवार काम करु शकतील. त्यामुळे आत्ताच त्यांनी अध्यक्ष पदावर योग्य व्यक्ती बसवली तर पुढील ३ वर्षात तो तयार होईल. यामुळे मला हा निर्णय योग्य वाटतोय. 

Sharad Pawar: शरद पवारांच्या निर्णयाने धक्का, पण..; बहिण सरोज पाटील यांनी स्पष्टच सांगितलं

शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस जातीयवादी पक्षासोबत तडजोड करेल का? या प्रश्नाला उत्तर देताना सरोज पाटील म्हणाल्या, शरद पवार जोपर्यंत आहे तो पर्यंत असं काही होईल असं मला वाटत नाही. 

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड व्हावी?

राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण व्हावा यावरही पाटील यांनी आपल मत मांडले. "मला असं वाटतं पुढच राष्ट्रीय अध्यक्षपद हे जयंत पाटील यांना द्यायला पाहिजे. ते अभ्यासू आहेत, ते फॉरेन रिटर्न आहेत. तिथला त्यांचा इकॉनॉमिक्स आणि राज्यशास्त्राचा अभ्यास चांगला आहे. त्यांचे व्यक्तीमत्व खूप चांगले आहे फक्त त्यांनी जरा स्पीडमध्ये काम करायला पाहिजे, असं मत सरोज पाटील यांनी व्यक्त केले. अजित पवार त्या पदावर बसले तर राज्यात बाकीची काम कोण करणार, सुप्रिया सुळे यांच्या संदर्भातही पाटील यांनी आपले मत मांडले. पाटील म्हणाल्या, सुप्रिया सुळे काम करु शकेल पण ती खासदार आहे, तिचा व्याप मोठा आहे. पण, तिला घरचं सगळ बघाव लागतं त्यामुळे सुप्रिया सुळे यांना देऊ नये असं मला वाटते असंही पाटील म्हणाल्या. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेससुप्रिया सुळेअजित पवार