ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 12 - शरीरसौष्ठव, कुस्ती, अॅथलेटिक्स यांसारख्या खेळांमध्ये करीअर करू इच्छिणा-या मुंबईकर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी 'सर्वात मजबूत मुंबईकर' कोण, या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. फिटनेसशी संबंधित विविध उत्पादनांच्या उत्पादनात देशात अग्रगण्या असलेल्या, मुंबईस्थित जेराई फिटनेसने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.मुंबईतील गोरेगाव येथील एनएसई मैदानावर १४ आॅक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महिला व पुरुष खेळाडू सहभागी होणार आहेत. ख्यातनाम शरीरसोष्ठवपटू यतिंदर सिंह यांच्यासह तज्ज्ञांची समिती 'सर्वात मजबूत मुंबईकर' खेळाडूची निवड करणार आहे.जेराई फिटनेसच्या माध्यमातून येत्या काही महिन्यांत महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये तरुण मुला-मुलींना फिटनेसचे प्रशिक्षण देण्याचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.त्यासाठी जेराई फिटनेस ग्राम पंचायतींसोबत काम करणार असून 'सर्वात मजबूत मुंबईकर' या उपक्रमाचा ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर असेल, तसंच जागतिक पातळीवरील विविध शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी जेराई फिटनेस त्याचा वा तिचा संपूर्ण आर्थिक भार उचलेल, अशी माहिती जेराई फिटनेसचे व्यवस्थापकीय संचालक राजेश राय यांनी दिली.