कुणी आधार देतं का आधार? अनेक अडचणींवर मात करत 'तिने' गाठलं मतदान केंद्र

By अोंकार करंबेळकर | Published: April 30, 2019 04:10 AM2019-04-30T04:10:10+5:302019-04-30T04:10:27+5:30

दिव्यांग तरुणीची व्यथा : अनेक अडचणींवर मात करून गाठले मतदान केंद्र

Who supports the basis? By defeating many problems, 'She' reached the polling center | कुणी आधार देतं का आधार? अनेक अडचणींवर मात करत 'तिने' गाठलं मतदान केंद्र

कुणी आधार देतं का आधार? अनेक अडचणींवर मात करत 'तिने' गाठलं मतदान केंद्र

Next

मुंबई : अकरावर्षापूर्वी झालेल्या अपघातात पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे विक्रोळीच्या सुमीया खान (३५) यांना कायमचे अपंगत्व आले. एकदा आजारपणामुळे मतदान हुकले. त्यानंतर, गेल्या निवडणूकीत दिव्यांगासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने पोलीओग्रस्त दिराचे हाल झाले. ते पाहून मतदानासाठी तिचे धाडस झाले नाही. यंदा मात्र सकाळपासूनच तिने मतदानाचा हट्ट धरला. ’कुणी आधार देत का आधार म्हणत’ मतदान केंद्र गाठले. सुरुवातीला शाळकरी विद्यार्थी सरसावले. ते पाहून तैनात पोलिसांनी त्यांना आधार दिला. आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

पार्क साईट परिसरात खान या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचे पती सादीक हे इंजिनीअर आहेत. तर त्यांचे मोठे दिर माजीद हे डॉक्टर आहेत. २००८ मध्ये बरोदा हायवेमार्गे अहमदाबादला जात असताना टेम्पोच्या धडकेत कारचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या मणक्याला दुखापत झाली. सुरुवातीचे दोन वर्ष त्या अंथरुणाला खिळल्या. त्यामुळे २००९ ला लोकसभा निवडणूकीत मतदान करता आले नाही. पुढे, व्हिलचेअरचा आधार त्यांनी घेतला.

पालिका शाळा क्रमांक ३ मधील पहिल्या मजल्यावर असलेल्या बुथ क्रमांक ९९ मध्ये त्यांचा क्रमांक आला. पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी व्हिलचेअर उचलून नेण्याची आवश्यकता होती. अखेर, २०१४ मध्ये दिर अजमद यांची गैरसोय झाली. यंदाही पहिल्याच माळ्यावर आल्याने, दिराने धास्ती घेतली. तर, सुमीयाने मात्र यंदा मतदान करण्यासाठी रविवारी रात्रीपासून पतीकडे आग्रह धरला. त्यांनीही संबंधित बुथवर जात त्यांना याबाबत सांगितले. सकाळीही ७ पाहून ती मतदानासाठी तयार होती, मात्र तेथे कोणी मदतीला नसल्याने तिला जात आले नाही. अखेर, सव्वा दहाच्या सुमारास तिने काहीही झाले तरी मतदान करणार म्हणत, केंद्र गाठले. तेथे सुरुवातीला निवडणूक कर्मचारी तसेच दिव्यांगासाठी विशेष सुविधा नसल्याचे सांगत, शाळकरी विद्यार्थी पुढे आले. मात्र त्यांना वजन पेलवणार नाही. अखेर, पतीने बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना केंद्रापर्यंत पोहचवले.

दहावीचे विद्यार्थी बनले मार्गदर्शक
येथीलच पालिका शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून उभे करण्यात आले होते. हे विद्यार्थी सर्वांना वाट दाखवत होते.
अखेर मतदानाचा हक्क बजावता आल्यामुळे पोलिसांचे आभार मानले. शिवाय, एखाद्या गोष्टीवर आवाज उठविण्यापूर्वी मतदान करणे महत्त्वाचे असल्याचे सुमीयाने सांगितले.

Web Title: Who supports the basis? By defeating many problems, 'She' reached the polling center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.