Join us

युती हवी कोणाला? पोस्टरबाजीतून भाजपाचा सेनेला विरोध

By admin | Published: January 12, 2017 10:25 AM

महापालिकात युती करण्यास काल सेना-भाजपामध्ये एकमत झाले असले तरी ठाणे येथिल भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लगावल्या पोस्टरवरुन स्थानिक पातळीवर या युतीला स्पष्ट विरोध असल्याचं दिसून येतं आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12 - महापालिकात युती करण्यास काल सेना - भाजपामध्ये एकमत झाले असले तरी ठाणे येथिल भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या पोस्टरवरुन स्थानिक पातळीवर या युतीला स्पष्ट विरोध असल्याचं दिसून येतं आहे. युती नको, विकास हवा! ठाण्यात शतप्रतिशत भाजपाच हवा!…, युती नाकारा ठाण्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करा...आम्ही ठाणेकर अशा प्रकारचेे पोस्टर ठाणे शहरात लावत, ठाणे भाजपने महापालिका निवडणुकांत युती करण्यास विरोध केला आहे. 
 
ठाण्यात आज भाजपच्या राज्यकार्यकारिणीची बैठक होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, विनोद तावडे आणि खडसे बैठकीला हजर राहणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ठाणे भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
 

ठाणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा यापूर्वीच शहर भाजपाने दिला होता. परंतु निवडणुकीची आचारसंहिता लागताच शिवसेनेने दिलेल्या टाळीला होकार देत भाजपाने देखील ठाणे, मुंबईतील युतीचा निर्णय घेण्याचे संकेत देत उर्वरित ठिकाणांचा निर्णय स्थानिक पातळीवरील पदाधिकारी घेतील असे असे जाहीर केले आहे. त्यामुळे ठाण्यात आता युती होणार हे जवळ जवळ निश्चित मानले जात होते. परंतु प्रदेशने घेतलेल्या या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील काही मंडळींनाही ही जोरदार चपराक लगावल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी देखील स्वबळाचा नारा दिला होता. परंतु आता हा दावा देखील फोल ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  दरम्यान बुधवारी महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आणि गुरुवारी ठाण्यात भाजपामध्ये पोस्टरयुध्द सुरु झाले. युती नाकारा ठाण्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करा, नको कुबडी युतीची करा तयारी एकहाती भाजपाच्या विजयाची, एकटे लढा ठाण्यातही व्हा नंबर वन, युती नको, विकास हवा अशा आशयाचे काळ्या रंगातील बॅनर बैठकीच्या ठिकाणच्या परिसरात लावण्यात आल्याने सर्वाचेच लक्ष वेधून घेत होते. विशेष म्हणजे या बॅनरच्या खाली आम्ही ठाणोकर एवढेच लिहण्यात आले होते. त्यामुळे हे बॅनर नेमके लावले कोणी असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला होता. या संदर्भात शहर भाजपाचे अध्यक्ष संदीप लेले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, ती एका समुहाची भावना आहे. जी त्यांनी या बॅनरच्या माध्यमातून बोलून दाखविली आहे. परंतु बॅनर कोणी लावले याचे उत्तर मात्र त्यांना देता आले नाही. 

 

भाजपाचे ‘चला जिंकूूू या महाराष्ट्र’

 
मुंबईसह राज्यातील दहा महापालिकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या १६५ पंचायत समित्यांची निवडणूक १६ फेब्रुवारीला तर दुसऱ्या टप्प्यात ११ जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार असून त्यासाठीची आचारसंहिता लागू झाली आहे.
 
 

अखेर बिगुल वाजले, आता लगीनघाई सुरू

 
 
 
 
 

युती केवळ मुंबई-ठाण्यापुरतीच