Join us

...तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारावीवरून उद्धव ठाकरेंना धरले धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 10:24 AM

मेळावा सुरू होण्यापूर्वी रिमझिम पाऊस सुरू झाला होता. या रिमझिम पावसात आझाद मैदानावर आलेले कार्यकर्ते मेळाव्यासाठी थांबले होते.

धारावीबाबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उत्तर दिले. धारावी हा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प, त्यातही काड्या घालण्याचे काम सुरू आहे. पहिला कंत्राटदार रद्द केला तेव्हा मुख्यमंत्री कोण होते, असा सवाल त्यांनी केला. शिवसेना दोन वर्षात आपले सरकार लाडके मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा पण धारावीकरांना त्याच चिखलात खितपत ठेवायचे काम करा. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, धारावीतील फक्त पात्र लोकांना घरे देणार, पण मी सांगितले सगळ्या २ लाख १० हजार जणांना घरे द्या आणि ते मी करतो आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले. गिरणी कामगारांना कधी घरे मिळाली नव्हती आपल्या सरकारने गिरणी कामगारांना घरे द्यायला सुरुवात केल्याचेही ते म्हणाले.

मेळावा सुरू होण्यापूर्वी रिमझिम पाऊस सुरू झाला होता. या रिमझिम पावसात आझाद मैदानावर आलेले कार्यकर्ते मेळाव्यासाठी थांबले होते. मात्र नेत्यांची भाषणे सुरू झाली आणि पाऊस थांबला. पुन्हा पाऊस येईल या शक्यतेने मोजक्या तीन नेत्यांची भाषणे झाली. तर एकनाथ शिंदे यांनी ४० मिनिटांचे भाषण केले. यापूर्वीच्या दोन दसरा मेळाव्यात शिंदेंनी एका तासापेक्षा जास्त भाषण केले होते.

दोन वर्षात आपले सरकार लाडके दोन वर्षात आपले सरकार जनतेचे लाडके सरकार झाले आहे. हे लाडक्या बहिणींचे, लाडक्या भावांचे, लाडक्या शेतकऱ्यांचे आणि सर्वांचेच लाडके सरकार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. लोकसभेत विरोधकांना चुकून एवढ्या जागा मिळाल्या, पण त्यांचे यश परमनंट नाही. विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता महायुतीला पूर्वीपेक्षा अधिक पाठबळ देऊन विजयी करणार आहे. हरयाणात जे झाले त्यांची पुनरावृत्ती महाराष्ट्रात घडणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव होऊन महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

मोदींनी मराठी माणसाला स्वाभिमान दिला निवडणुकीनंतर विधानसभेवर महायुतीचा भगवा फडकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन फक्त मराठीलाच नाही तर मराठी माती, मराठी माणसाला स्वाभिमान मिळवून दिला आहे. त्यांना मी त्रिवार सॅल्यूट करतो. त्यांनी मराठीला फक्त अभिजात दर्जा दिला नाही, तर उद्धव ठाकरे यांना सणसणीत लाफा लगावला आहे. युतीचे नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अडीच वर्षात खूप काम केले आहे. अडीचशे लोकाभिमुख योजना त्यांनी दिल्या आहेत. त्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवा. - रामदास कदम, नेते, शिदेसेना

उद्धव ठाकरे हे रंग बदलणारा सरडा एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा बाप चोरला, असा आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भगवा रंग बदलला. आता मातोश्रीचे नाव बदलून ते अम्मीजान ठेवणार आहेत. ते रंग बदलणारा सरडा आहेत. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. पण तुमच्या मागणीकडे कोणीही लक्ष देत नाही. मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना तुम्ही कार्ट म्हणता मग तुमच्या मुलाला कार्टून म्हणायचे का, असा सवाल वाघमारे यांनी केला. - ज्योती वाघमारे, प्रवक्त्या, शिदेसेना

मविआचा कार्यक्रम महिलाच करणार राज्यातील ५० टक्के लोकसंख्या असलेल्या महिलाच महाविकास आघाघाडीचा कार्यक्रम करणार आहे. आतापर्यंत बाई माणसाकडे पैसे मागायची आता माणूस बाईकडे पैसे मागतो. मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीचे हात सक्षम केल्याने हा चमत्कार झाला. आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही. लोकसभा निवडणुकीत फेक नेरेटीव्ह पसरवून मतदान घेतले. पण आता शिंदे सरकारने केलेल्या कामांचा प्रचार केला तर आपले शंभर टक्के उमेदवार निवडून येतील. मविआतील पक्षांचा सत्यानाश करण्यासाठी शिंदेंना उदंड आयुष्य द्यावे. - गुलाबराव पाटील, नेते आणि मंत्री, शिदेसेना

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरे