मनसेची मुंबईतील 5 लाख मते कुणाच्या पारड्यात? लोकसभेच्या सहा जागांचे भवितव्य होणार निश्चित

By रेश्मा शिवडेकर | Published: March 20, 2024 06:35 AM2024-03-20T06:35:08+5:302024-03-20T06:35:51+5:30

मनसेचे उमेदवार २०१९ मध्ये ७ ठिकाणी दुसऱ्या स्थानावर

who will be favored in Lok Sabha Election 2024 by 5 Lakh Voters of MNS Raj Thackeray in Mumbai | मनसेची मुंबईतील 5 लाख मते कुणाच्या पारड्यात? लोकसभेच्या सहा जागांचे भवितव्य होणार निश्चित

मनसेची मुंबईतील 5 लाख मते कुणाच्या पारड्यात? लोकसभेच्या सहा जागांचे भवितव्य होणार निश्चित

रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ३६ पैकी केवळ २५ मतदारसंघांत निवडणूक लढवत मिळवलेली पाच लाखांच्या आसपास मते मिळाली होती. तेवढी मते येत्या  लोकसभा निवडणुकीत मनसेला मिळणार का? व मिळाली तर कुणाच्या विजयात मोजली जाणार हा चर्चेचा विषय आहे.

मनसेने त्यावेळी २५ विधानसभा लढवून मिळविलेल्या ४.६२ लाख मतांपैकी सर्वाधिक १.२३ लाख मते उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या मुलुंड, विक्रोळी, भांडूप पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि घाटकोपर पूर्व इथली होती. येथील मानखुर्द शिवाजीनगरमधून मनसेने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे भाजपच्या साथीला मनसे आल्यास येथून इंडिया आघाडीविरोधात उभे ठाकलेले भाजपचे मिहीर कोटेचा यांच्यासाठी लोकसभेचा पेपर सोपा ठरण्याची शक्यता आहे.

त्याखालोखाल अणुशक्ती नगर, चेंबूर, धारावी, सायन- कोळीवाडा, वडाळा, माहीम या शिवसेनेचा (उबाठा) गड असलेल्या दक्षिण मध्य मुंबईतून मनसेला ९६,४९८ मते मिळाली होती. माहीममध्ये तर तब्बल ४२ हजार ६९० मते मनसेच्या संदीप देशपांडे यांनी घेतली होती. माहीम खालोखाल मागाठाणे येथून मनसेच्या नयन कदम यांनी ४१,०६० मते घेतली होती. मागाठाण्याचा समावेश असेलल्या उत्तर मुंबईतून भाजपने पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचा गड असलेल्या या मतदारसंघात मनसेने सहापैकी केवळ तीन विधानसभा जागा लढवून ६८,२४४ मते मिळवली, हे विशेष.

कोविडकाळात मनसेने रस्त्यावर उतरून काम केले आहे. उपनगरांत आरोग्य, शिक्षण, वीजबिल, फेरीवाले यांच्या प्रश्नांवर मनसे गेली काही वर्षे सातत्याने रस्त्यावर उतरते आहे. त्यामुळे मनसेच्या मतांत गेल्या पाच वर्षांत आणखी २० ते २५ टक्क्यांची भर पडली आहे.
- नयन कदम, सरचिटणीस, मनसे

  • ७ ठिकाणी दुसऱ्या स्थानावर

मनसेचे उमेदवार २०१९ मध्ये माहीम, मागाठाणे, शिवडी, मुलुंड, भांडूप, घाटकोपर पूर्व आणि पश्चिम या सात ठिकाणी दुसऱ्या स्थानावर होते, तर १५ ठिकाणी तिसऱ्या स्थानावर.

मनसेला २०१९ च्या विधानसभेत मिळालेली मते

मुंबई उत्तर पूर्व (लोकसभा)

मुलुंड     २९,९०५
विक्रोळी     १६,०४२
भांडूप पश्चिम     ४२,७८२
घाटकोपर पश्चिम    १५,०१९
घाटकोपर पूर्व     १९,७३५
मानखुर्द नेहरूनगर- लढत नाही.
एकूण मते     १,२३,४८३

-----------

मुंबई उत्तर पश्चिम (लोकसभा)

दिंडोशी     २५,८५४
गोरेगाव     २६,६८९
वर्सोवा     ५,०३७
अंधेरी पश्चिम     ६,८९१
जोगेश्वरी पूर्व, 
अंधेरी पश्चिम-     लढत नाही
एकूण मते     ६४,४७१

-----------

मुंबई उत्तर मध्य (लोकसभा)

विलेपार्ले     १८,४०६
चांदिवली     ७,०९८
कुर्ला     ९,७७१
कलिना     २२,४०५
वांद्रे पूर्व     १०,६८३
वांद्रे पश्चिम     लढत नाही
एकूण मते     ६८,३१३

------------

मुंबई दक्षिम मध्य (लोकसभा) 

अणुशक्तीनगर     ५,८७९
चेंबुर     १४,४०४
धारावी     ४,०६२
सायन कोळीवाडा    १३,६८४
वडाळा     ५,७७९
माहीम     ४२,६९०
एकूण मते     ९६,४९८

-------------

मुंबई उत्तर (लोकसभा)

दहिसर    १७,०५२
मागाठाणे     ४१,०६०
कांदिवली पूर्व    १०,१३२
बोरिवली, मालाड 
पश्चिम, चारकोप-     लढत नाही
एकूण मते    ६८,२४४

---------------

मुंबई दक्षिण (लोकसभा)

शिवडी     ३८,३५०
मुंबादेवी     ३,१८५
मलबार हिल,वरळी,  
भायखळा, कुलाबा-    लढत नाही
एकूण मते     ४१,५३५

Web Title: who will be favored in Lok Sabha Election 2024 by 5 Lakh Voters of MNS Raj Thackeray in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.