रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ३६ पैकी केवळ २५ मतदारसंघांत निवडणूक लढवत मिळवलेली पाच लाखांच्या आसपास मते मिळाली होती. तेवढी मते येत्या लोकसभा निवडणुकीत मनसेला मिळणार का? व मिळाली तर कुणाच्या विजयात मोजली जाणार हा चर्चेचा विषय आहे.
मनसेने त्यावेळी २५ विधानसभा लढवून मिळविलेल्या ४.६२ लाख मतांपैकी सर्वाधिक १.२३ लाख मते उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या मुलुंड, विक्रोळी, भांडूप पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि घाटकोपर पूर्व इथली होती. येथील मानखुर्द शिवाजीनगरमधून मनसेने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे भाजपच्या साथीला मनसे आल्यास येथून इंडिया आघाडीविरोधात उभे ठाकलेले भाजपचे मिहीर कोटेचा यांच्यासाठी लोकसभेचा पेपर सोपा ठरण्याची शक्यता आहे.
त्याखालोखाल अणुशक्ती नगर, चेंबूर, धारावी, सायन- कोळीवाडा, वडाळा, माहीम या शिवसेनेचा (उबाठा) गड असलेल्या दक्षिण मध्य मुंबईतून मनसेला ९६,४९८ मते मिळाली होती. माहीममध्ये तर तब्बल ४२ हजार ६९० मते मनसेच्या संदीप देशपांडे यांनी घेतली होती. माहीम खालोखाल मागाठाणे येथून मनसेच्या नयन कदम यांनी ४१,०६० मते घेतली होती. मागाठाण्याचा समावेश असेलल्या उत्तर मुंबईतून भाजपने पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचा गड असलेल्या या मतदारसंघात मनसेने सहापैकी केवळ तीन विधानसभा जागा लढवून ६८,२४४ मते मिळवली, हे विशेष.
कोविडकाळात मनसेने रस्त्यावर उतरून काम केले आहे. उपनगरांत आरोग्य, शिक्षण, वीजबिल, फेरीवाले यांच्या प्रश्नांवर मनसे गेली काही वर्षे सातत्याने रस्त्यावर उतरते आहे. त्यामुळे मनसेच्या मतांत गेल्या पाच वर्षांत आणखी २० ते २५ टक्क्यांची भर पडली आहे.- नयन कदम, सरचिटणीस, मनसे
- ७ ठिकाणी दुसऱ्या स्थानावर
मनसेचे उमेदवार २०१९ मध्ये माहीम, मागाठाणे, शिवडी, मुलुंड, भांडूप, घाटकोपर पूर्व आणि पश्चिम या सात ठिकाणी दुसऱ्या स्थानावर होते, तर १५ ठिकाणी तिसऱ्या स्थानावर.
मनसेला २०१९ च्या विधानसभेत मिळालेली मते
मुंबई उत्तर पूर्व (लोकसभा)
मुलुंड २९,९०५विक्रोळी १६,०४२भांडूप पश्चिम ४२,७८२घाटकोपर पश्चिम १५,०१९घाटकोपर पूर्व १९,७३५मानखुर्द नेहरूनगर- लढत नाही.एकूण मते १,२३,४८३
-----------
मुंबई उत्तर पश्चिम (लोकसभा)
दिंडोशी २५,८५४गोरेगाव २६,६८९वर्सोवा ५,०३७अंधेरी पश्चिम ६,८९१जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पश्चिम- लढत नाहीएकूण मते ६४,४७१
-----------
मुंबई उत्तर मध्य (लोकसभा)
विलेपार्ले १८,४०६चांदिवली ७,०९८कुर्ला ९,७७१कलिना २२,४०५वांद्रे पूर्व १०,६८३वांद्रे पश्चिम लढत नाहीएकूण मते ६८,३१३
------------
मुंबई दक्षिम मध्य (लोकसभा)
अणुशक्तीनगर ५,८७९चेंबुर १४,४०४धारावी ४,०६२सायन कोळीवाडा १३,६८४वडाळा ५,७७९माहीम ४२,६९०एकूण मते ९६,४९८
-------------
मुंबई उत्तर (लोकसभा)
दहिसर १७,०५२मागाठाणे ४१,०६०कांदिवली पूर्व १०,१३२बोरिवली, मालाड पश्चिम, चारकोप- लढत नाहीएकूण मते ६८,२४४
---------------
मुंबई दक्षिण (लोकसभा)
शिवडी ३८,३५०मुंबादेवी ३,१८५मलबार हिल,वरळी, भायखळा, कुलाबा- लढत नाहीएकूण मते ४१,५३५