विनोद तावडेंना आव्हान कोण देणार? काँग्रेसची सक्षम उमेदवारीसाठी चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 02:08 AM2019-09-10T02:08:22+5:302019-09-10T02:08:58+5:30

उत्तर मुंबई हा भाग बहुभाषिक असला, तरी बोरीवली मतदारसंघात मराठी भाषिक मतदारांचे प्रमाण चांगले आहे

Who will challenge Vinod Tawade? Examine for a competent congressional candidate | विनोद तावडेंना आव्हान कोण देणार? काँग्रेसची सक्षम उमेदवारीसाठी चाचपणी

विनोद तावडेंना आव्हान कोण देणार? काँग्रेसची सक्षम उमेदवारीसाठी चाचपणी

Next

सीमा महांगडे

मुंबई : राज्याचे उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना विधानसभेवर निवडून पाठवणारा बोरिवली हा मतदारसंघ म्हणजे भाजपचा बालेकिल्ला. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून तावडे यांनी सहज विजय संपादन केला. यंदाही त्यांना लढत देईल असा तुल्यबळ उमेदवार विरोधकांना अजून सापडलेला नाही.

उत्तर मुंबई हा भाग बहुभाषिक असला, तरी बोरीवली मतदारसंघात मराठी भाषिक मतदारांचे प्रमाण चांगले आहे. २०१४ साली मूळचे विलेपाल्यार्चे असूनही बोरिवलीकरांनीविनोद तावडेंना आमदार म्हणून संधी दिली. मुंबईसाठी ५५०० कोटी रुपयांची एमयूटीपी योजना मंजूर करणे असो किंवा मराठा आंदोलनात तावडे यांनी घेतलेली भूमिका असो, याच्यामुळे त्यांचे स्थान बळकट झाले आहे.सुरूवातीला तावडे यांच्याकडे शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्र शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण, मराठी भाषा आणि सांस्कृतिक ही खाती सोपविण्यात आली. मंत्री पदाचा कार्यभार सांभाळल्यापासून तावडे सतत चर्चेत आणि वादात राहिले. २०१५ मध्ये बोगस पदवीच्या आरोपावरून अडचणीत आले होते. शालेय उपकरण खरेदीमध्ये अनियमितता, शालेय शिक्षण विभागाचे अमलबजावणी करता न येण्यासारखे अनेक निर्णय यामुळेही तावडे सतत विरोधकांचे लक्ष्य राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या विस्तारामध्ये शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्रालय काढून आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आले.

कॉंग्रेसकडून शिवा शेट्टी तर मनसेकडून नयन कदम हे या मतदारसंघातील संभाव्य विरोधी उमेदवार मानले जातात. मात्र तशी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र तावडे हे विरोधकांचे लक्ष्य असेल हे नक्की.

पाच वर्षात काय घडले?

  • मुंबई महापालिकेत भाजपला घवघवीत यश मिळाले.स्वत: तावडे यांचे मंत्रिमंडळातले स्थान घसरले.
  • २०१५ मध्ये बोगस पदवीच्या आरोपावरून अडचणीत आले.
  • मतदारसंघात मार्वे ते मनोरी रो रो जेट्टी सेवा सुरू करण्यात आली. यामुळे तेथील नागरिकांचा वेळ वाचला. मनोरीतील पर्यटनालाही चालना मिळाली.
  • बोरिवलीमध्ये ८ हेक्टरच्या परिसरात देशातील पहिले कांदळवन उद्यान उभारण्यात येत आहे. नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतेच याचे भूमिपूजन करण्यात आले.
  • बोरिवली पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सायन्स पार्क, बर्ड पार्क यांच्यावर काम सुरु आहे.


आमदार म्हणून विनोद तावडे हे मतदारसंघात दिसलेच नाहीच, पण पालकमंत्री म्हणून तरी ते नेमके आहेत कुठे याचा पत्ताच कोणालच नाही. तावडे यांनी शिक्षण खात्याचा बट्टयाबोळ केला. ते सतत वादात राहिल्याने त्यांच्याविषयीची सहानुभूती आता शिल्लक नाही. सामान्य नागरिकांपासून हे आमदार खूप दूर असल्याने त्यांना नागरिकांच्या समस्यांची जाणीवच नाही. - धनंजय जुन्नरकर, प्रवक्ते, मुंबई काँग्रेस

संभाव्य प्रतिस्पर्धी
शिवा शेट्टी (काँग्रेस)
नयन कदम (मनसे)

Web Title: Who will challenge Vinod Tawade? Examine for a competent congressional candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.