सेंट्रल मैदानात बाजी कोण मारणार?
By admin | Published: September 30, 2014 11:30 PM2014-09-30T23:30:38+5:302014-09-30T23:30:38+5:30
ठाण्यातील सभेचे मैदान म्हणून ओळख असलेले सेंट्रल मैदान सद्य:स्थितीत तरी तीनच पक्षांनी आरक्षित केलेले आहे.
Next
>पंकज रोडेकर ल्ल ठाणो
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मुंबईत फुटला असला तरी ठाण्यात अद्याप त्याबाबतचे चित्र अजूनही तसे दिसत नाही. ठाण्यातील सभेचे मैदान म्हणून ओळख असलेले सेंट्रल मैदान सद्य:स्थितीत तरी तीनच पक्षांनी आरक्षित केलेले आहे. त्यामुळे शेवटच्या तीन ते चार या दिवसांत हे मैदान मिळविण्यासाठी बाजी कोण मारणार व कोण तारीख बदलून माघार घेणार, याकडे नेत्यांसह कार्यकत्र्याच्या नजरा लागल्या आहेत. तारखांचा हा तिढा सोडविण्यासाठी मैदान कमिटीपुढे पेच निर्माण झाल्याची माहिती सूत्रंनी दिली.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे एकमेव मैदान आहे. त्यामुळे सर्वच नेत्यांचे या मैदानाला प्राधान्य असते. विशेष म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि सभेला येणा:या-जाणा:यांसाठी ते सोयीचे आहे. मैदानाच्या तिन्ही बाजूंना रस्ता असल्याने अचानक गर्दी वाढल्यास तिथे उभे राहण्याचीही पुरेशी व्यवस्था आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यावर सभेसाठी ते आरक्षित करण्यासाठी सर्वपक्षीय नेते धाव घेतात. येत्या 15 ऑक्टोबर रोजी मतदान आहे. त्यामुळे या महिन्यातील दुस:या आठवडय़ात या मैदानात सभा होणार आहेत. यासाठी 7 ऑक्टोबर बहुजन समाज पार्टीने, 1क् ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तर 11 रोजी शिवसेनेने हे मैदान आरक्षित केले आहे. प्रचार 13 ऑक्टोबर रोजी थंडावणार असल्याने शुक्रवार, शनिवार आणि रविवारी प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या भाषणांनी हे मैदान दुमदुमणार आहे.
या मैदानात आतार्पयत शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, केंद्रीय कृ षिमंत्री शरद पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपा नेते नरेंद्र मोदी, रिपाइं नेते रामदास आठवले आदी नेत्यांच्या सभा झाल्या आहेत. मात्र, त्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब यांच्यानंतर राज ठाकरे यांनाच या मैदानात गर्दी खेचण्यात यश आले आहे.