मुंबई : आषाढी एकादशीला पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुख्माईची महापूजा करायला कोणते मुख्यमंत्री येणार हे विठुमाउलींनाच ठाऊक, मी काही सांगू शकत नाही, मी निवांत बसलो आहे अशी टोलेबाजी सध्याच्या राजकीय तणावाच्या वातावरणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.आषाढी वारीच्या स्वागतासाठी पुण्यात गेले असता ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यसभा निवडणुकीतील गुलाल अजूनही डोक्याला आहे असे विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर चंद्रकांत पाटील यांनी डोक्यावरील गुलाल दाखवीत पत्रकारांना सांगितले होते. आता मुख्यमंत्रिपद भाजपला मिळण्याचा गुलाल उधळणार का, या प्रश्नात ते टोपी काढून केसांवरील गुलाल दाखवीत म्हणाले की, आता हा गुलाल मी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील विजयासाठी शिल्लक ठेवला आहे. आषाढी एकादशीला महापूजेसाठी जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांसमवेत आपण असाल काय, हा प्रश्नही त्यांनी विनोदाने टोलवला.
महापूजा कोण करणार; माउलीच्या मनात काय? राजकीय तणावातही पाटलांची टोलेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 9:12 AM