Join us

यावेळी कुणाला मिळणार आदिवासींची साथ? भाजपकडून पुन्हा तोच चेहरा मैदानात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2024 7:22 AM

बसपने भलावी यांचे चिरंजीव अर्जुन यांना उमेदवारी दिली आहे.

विनय उपासनी, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बसपचे उमेदवार अशोक भलावी यांच्या निधनामुळे अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या बैतुल लोकसभा मतदारसंघातील मतदान आता ७ मे रोजी होणार आहे. याआधी २६ एप्रिल रोजी मतदान होणार होते. बसपने भलावी यांचे चिरंजीव अर्जुन यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने विद्यमान खासदार दुर्गादास उईके यांच्यावर विश्वास दाखवत पुन्हा त्यांना तिकीट दिले आहे. तर काँग्रेसकडून रामू तिकम यांचे त्यांना आव्हान असेल. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत हाेणार आहे. 

बैतुल लोकसभा मतदारसंघाने १९९६ पासून भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे उईके यांना ही निवडणूक तशी सोपीच ठरण्याची चिन्हे आहेत. त्याउलट तिकम यांना त्यांच्याच पक्षातील तीन आमदारांचा विरोध आहे. त्यामुळे  त्यांना स्वपक्षाची साथ कितपत लाभेल, हा प्रश्नच आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्देआदिवासींचे प्राबल्य अधिक आहे. ओबीसी आणि इतर जातींचे मतदारांचे प्रमाण अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यातच अल्पसंख्याक मतदारही लक्षणीय आहेत. तरीही आदिवासींची एकगठ्ठा मते भाजपच्या पारड्यात जातात. काँग्रेससाठी हा मतदारसंघ डोकेदुखी ठरत आला आहे. आतापर्यंत आठवेळा काँग्रेसला येथे पराभव स्वीकारावा लागला आहे. रामू तिकम हे गेल्या वेळेसही पराभूत झाले होते. 

२०१९ मध्ये काय घडले?दुर्गादास उईके भाजप (विजयी) ८,११,२४१ रामू तिकम काँग्रेस (पराभूत) ४,५१,००७

टॅग्स :मुंबईभाजपाकाँग्रेसबहुजन समाज पार्टीलोकसभा निवडणूक २०२४