ग्लिसरीनची सर्रास विक्री; गाम्बिया प्रकरणानंतर तरी जाग येईल?

By स्नेहा मोरे | Published: October 8, 2022 11:33 AM2022-10-08T11:33:42+5:302022-10-08T11:34:14+5:30

ग्लिसरीनयुक्त औषधांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

wholesale sale of glycerine will gambia incident wake up after the affair | ग्लिसरीनची सर्रास विक्री; गाम्बिया प्रकरणानंतर तरी जाग येईल?

ग्लिसरीनची सर्रास विक्री; गाम्बिया प्रकरणानंतर तरी जाग येईल?

googlenewsNext

स्नेहा मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पश्चिम आफ्रिकेतील गाम्बिया या देशात कफ सिरपमुळे ६० हून अधिक मुलांना जीव गमवावा लागला असून, भारतातून आयात होणाऱ्या कफ सिरपवर तिथे बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ग्लिसरीनयुक्त औषधांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

राज्यात सर्रास विक्री होत असलेले ग्लिसरीन हे औषध नसून औद्योगिक वापरासाठीचे द्रव्य आहे. मात्र, असे असूनही आरोग्याच्या तक्रारींसाठी त्याचा औषध म्हणून वापर केला जातो. औषधाच्या नावाखाली या  जीवघेण्या ग्लिसरीनची बाजारात सर्रास विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या विक्रीबाबत एफडीएकडे तक्रार करूनही  कायद्याच्या चौकटीत न बसल्याने तपासणी करू शकत नाही, असे एफडीएचे म्हणणे आहे. 

ग्लिसरीन जीवघेणे कसे होते

अनेक मोठ्या कंपन्या ग्लिसरीनचे कच्चे द्रव्य उत्पादित करतात. या उत्पादकांकडून औषध विक्रेते आणि औषधविक्री करत नसलेले व्यावसायिक ग्लिसरीनची आयात करतात. त्यानंतर हे ग्लिसरीन छोट्या रिपॅकर्सकडे पाठविले जाते, या रिपॅकर्सना अन्न व औषध प्रशासनाचा परवाना मिळालेला असतो. हे रिपॅकर्स या ग्लिसरीनमधील शुद्धता तपासतात. त्यात इंडियन फार्माकोपिया कमिशन प्रमाणित ९९ टक्के शुद्धता असेल, तर त्यावर आयपी श्रेणीचा शिक्का दिला जातो. हे ग्लिसरीन वैद्यकीय वापरासाठी योग्य असते. मात्र काही औषधविक्रीचा परवाना नसलेल्या काही कंपन्या ग्लिसरीनचा अन्य वापर करण्यासाठी आयात करतात. बऱ्याचदा ही आयात ड्रममधून केली जाते, अनेकदा हे ग्लिसरीन आयात करताना त्यात अन्य घटक मिसळले जातात. त्यामुळे रसायनांच्या मिश्रणातून प्रक्रिया होऊन डायथिलीन ग्यायकॉलची निर्मिती होते. 

मुंबईत १९८६ मध्ये... 

१९८६ मध्ये मुंबईच्या एका रुग्णालयात अनेक रुग्णांना ग्लिसरीन देण्यात आले होते.  यानंतर मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे २१ रुग्णांचा मृत्यू झाला होता.  त्यांना  देण्यात आलेल्या ग्लिसरीनमध्ये डायथिलीन ग्लायकॉल मिसळले असल्याचे तपासणीत आढळले होते. कफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल हे कार्बनचे संयुग आहे. प्रति किलो एक ग्रॅमपेक्षा जास्त मिसळल्यास मृत्यू होऊ शकतो, असे डॉ. योगेश शाह म्हणाले. 

वैद्यकीय वापरासाठी असेल तरच नियंत्रण 

बाजारात दोन प्रकारचे ग्लिसरीन मिळतात. वैद्यकीय वापरासाठी असलेलेल्या ग्लिसरीनसाठी अन्न व औषध प्रशासनाचा परवाना लागतो, त्यामुळे त्यावर एफडीएचे नियंत्रण असते; परंतु औद्योगिक वापरासाठी असलेल्या ग्लिसरीनसाठी एफडीएच्या परवान्याची आवश्यकता भासत नाही, त्यामुळे ते ग्लिसरीन एफडीएच्या नियमांच्या चौकटीबाहेर आहे. गाम्बियामध्ये घडलेल्या घटनेत हरयाणातील उत्पादकाने खास निर्यात करण्यासाठी त्या कफ सिरपचे उत्पादन केले होते, राज्यात त्याचे कुठेही वितरण झालेले नाही. - गणेश रोकडे, सहआयुक्त (औषध), अन्न व औषध प्रशासन विभाग

‘ते’ ग्लिसरीन धोकादायकच 

देशात ग्लिसरीनचे ४० उत्पादक मुंबई, उल्हासनगर, इंदोर, सांगली, नागपूर आदी शहरांमध्ये पसरलेले आहेत. याबाबत औषध उत्पादक बोलत नाही, शिवाय या नमुन्यांची तपासणीही होत नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या धर्तीवर एखाद्या औषधाचे नमुने सदोष आढळल्यास त्यावर त्वरित कार्यवाही केली जाते, असा नियम आहे. मात्र गाम्बिया घटनेतील कफ सिरप गुजरातमध्ये २०१५ मध्ये सदोष आढळल्यानंतर यावर कार्यवाही झालेली नाही. - अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाउंडेशन. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: wholesale sale of glycerine will gambia incident wake up after the affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई