पार्ल्यात झेंडा कुणाचा; सत्तांतर की...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 01:23 AM2019-08-30T01:23:02+5:302019-08-30T01:23:05+5:30

मनसे फॅक्टर ठिकठिकाणी महत्त्वाचा ठरला होता.

Who's the flag in the parley for vidhansabha? | पार्ल्यात झेंडा कुणाचा; सत्तांतर की...

पार्ल्यात झेंडा कुणाचा; सत्तांतर की...

Next

सचिन लुंगसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विलेपार्ले हा मराठी भाषिक परिसर म्हणून ओळखला जात असतानाही २००४, २००९ आणि २०१४ या तिन्ही विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला पराभव पत्कारावा लागला आहे. मागील ३ विधानसभा निवडणूकीचा विचार करता विलेपार्ले विधानसभेवर दोनवेळा काँग्रेसचा उमेदवार तर एक वेळा भाजपाचा उमेदवार विजयी झाला आहे. विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यास अद्याप पंधरा दिवसांचा कालावधी शिल्लक असून, युती आणि आघाडीबाबत ठोस निर्णय झालेला नाही. मात्र तरिही येथील भाजपच्या खुर्चीस सुरुंग लागणार की...? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.


२००४ सालच्या विधानसभा निवडणूकीचा विचार करता काँग्रेसने विलेपार्ले विधानसभा मतदार संघातून अशोक जाधव यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनेने विनायक राऊत यांना उमेदवारी दिली होती. अशोक जाधव यांना ५६ हजार ४३६ मते मिळाली. विनायक राऊत यांना ४२ हजार ६३४ मते मिळाली. जाधव हे १३ हजार ८०२ एवढया मताधिक्यांनी विजयी झाले होते.
२००९ सालच्या विधानसभा निवडणूकीदरम्यान विलेपार्ले विधानसभेतून काँग्रेसचे उमेदवार कृष्णा हेगडे आणि शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात मुख्य सामना रंगला होता. कृष्णा हेगडे यांना ४४ हजार ३३८ मते मिळाली होती. विनायक राऊत यांना ४२ हजार ६३४ मते मिळाली होती. अवघ्या १ हजार ७०४ मतांनी हेगडे यांचा विजय तर राऊत यांचा पराभव झाला होता.


मनसे फॅक्टर त्यावेळी ठिकठिकाणी महत्त्वाचा ठरला होता. विलेपार्ले विधानसभा मतदार संघात मनसेने शिरिष पारकर यांना उमेदवारी दिली होती. पारकर यांना येथून ३५ हजार १५६ मते मिळाली होती. मनसेच्या उमेदवारामुळे शिवसेनेच्या उमेदवारी मते कमी झाली होती. त्यानुसार, जर आणि तरचा विचार करता मनसेकडून शिरिष पारकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले नसते तर ही मते एका अर्थाने शिवसेनाला म्हणजे विनायक राऊत यांना मिळाली असती. म्हणजे येथून विनायक राऊत विजयी झाले असते. मनसेने घेतलेल्या मतांमुळे शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. आणि काँग्रेसचे कृष्णा हेगडे विजयी झाले होते.


२०१४ सालच्या विधानसभा निवडणूकीदरम्यान विलेपार्ले विधानसभेतून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पराग अळवणी आणि शिवसेनेचे उमेदवार शशिकांत पाटकर यांच्यात मुख्य लढत झाली होती. पराग अळवणी यांना त्यावेळी ७४ हजार २७० मते मिळाली होती. शशिकांत पाटकर यांना ४१ हजार ८३५ मते मिळाली होती. अळवणी यांचा ३२ हजार ४३५ मतांनी विजय तर पाटकर यांचा पराभव झाला होता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे २००९ साली आमदार म्हणून विजयी झालेले कृष्णा हेगडे यांना यावेळी २४ हजार १९१ मते मिळाली होती. आणि याहून महत्त्वाचे म्हणजे २००९ साली पहिल्या क्रमांकावर असलेले हेगडे २०१४ साली थेट तिसऱ्या स्थानावर फेकले गेले होते. दरम्यान, यावेळी नोटास यावेळी १ हजार ५१३ मते प्राप्त झाली होती.


विलेपार्ले येथील भाजपचे आमदार पराग अळवणी यांची या विधानसभा मतदार संघावर एकहाती सत्ता आहे. कार्यकर्त्यापासून नगरसेवक आणि आमदारापर्यंत मजल मारताना अळवणी यांनी हा परिसर उत्तमरित्या बांधून ठेवला आहे. महत्त्वाचे म्हणजे अळवणी यांचा केवळ मतदार संघाचा नाही तर मुंबईचा उत्तम अभ्यास आहे. विमानतळ परिसरातील फनेल झोन आणि विमानतळ परिसरातील झोपड्यांच्या पुनर्वसनाबाबत अळवणी कार्यरत आहेत.
विधानसभा २००९-मतदार
च्पुरुष - १ लाख ४५ हजार ८८
च्महिला - १ लाख २७ हजार २९३
च्एकूण - २ लाख ७२ हजार ३८१
विधानसभा २०१४-मतदार
च्पुरुष - १ लाख ५१ हजार ६४४
च्महिला - १ लाख ३४ हजार ५१४
च्एकूण - २ लाख ८६ हजार १५८

Web Title: Who's the flag in the parley for vidhansabha?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.