कुणाचे उमेदवार श्रीमंत अन् कुणाचे सर्वांत गरीब?; लोकसभेचा लेखाजोखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 09:16 IST2024-04-07T07:16:35+5:302024-04-07T09:16:19+5:30
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲड. प्रकाश आंबेडकर यांची संपती ही अवघी ८२ लाख रुपये एवढी आहे.

कुणाचे उमेदवार श्रीमंत अन् कुणाचे सर्वांत गरीब?; लोकसभेचा लेखाजोखा
लोकमत न्यूज नेटवर्क,
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरलेल्या प्रमुख ११ उमेदवारांपैकी १० जण हे कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक असल्याचे संपत्तीच्या विवरणातून समोर आले आहे. २६ एप्रिलला आठ मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यामध्ये अकोल्यातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागून आहे. येथील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांची एकूण संपत्ती ३९.४४ कोटी रुपये आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲड. प्रकाश आंबेडकर यांची संपती ही अवघी ८२ लाख रुपये एवढी आहे.