दसरा मेळावा नेमका कुणाचा? शिवसेनेचा, शिंदे गटाचा की मनसेचा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 09:08 AM2022-08-31T09:08:17+5:302022-08-31T09:08:57+5:30
Maharashtra Politics: शिवसेना आणि दसरा मेळावा हे मागील ५ दशकांहून अधिक काळाचे समीकरण आहे. मात्र, आता शिवाजी पार्कवरील याच दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात वाद पेटला आहे. अशातच या वादात आता मनसेनेही उडी घेतली आहे.
मुंबई : शिवसेना आणि दसरा मेळावा हे मागील ५ दशकांहून अधिक काळाचे समीकरण आहे. मात्र, आता शिवाजी पार्कवरील याच दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात वाद पेटला आहे. अशातच या वादात आता मनसेनेही उडी घेतली आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये देशपांडे म्हणतात की, ‘शिवतीर्थ’वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे! आजच्या घडीला दोन्ही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे, पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ‘वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो’, असे ट्विट करून देशपांडे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे.