एकीकडे उत्पादन विकण्यासाठी स्त्रीत्वाचे प्रदर्शन सर्रास मांडायचे आणि दुसरीकडे संस्कृती रक्षणाच्या लेबलखाली तिच्या पोषाखावर बंधने आणायची.. गेल्या काही दिवसांतल्या घटनांतून समाजाची ही दुटप्पी वृत्ती अधोरेखित झाली. गौहर खानला झालेली मारहाण असो वा आयटम साँगवर नाचणा:या अभिनेत्रींना वेश्या ठरवण्यात यावे, हे हिंदू महासभेच्या नवीन त्यागींचे मत असो. समाजाचा कांगावेखोरपणाच यातून चव्हाटय़ावर आला. स्त्रीदेहाचे प्रदर्शन असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा स्त्रीदेहाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा विचारही करायला हवा!
रुषप्रधान संस्कृतीने पछाडलेल्या आणि बुरसटलेल्या विचारसरणीला चिकटलेल्या मनोवृत्तीचे दर्शन अलीकडच्या काही घटनांमधून आपल्याला झाले. हिंदू महासभेच्या उत्तर प्रदेश विभागाचे सचिव नवीन त्यागी यांनी ‘चित्रपटातील आयटम साँगवर नाचणा:या आणि देहप्रदर्शन करणा:या अभिनेत्रींना वेश्या ठरविण्यात यावे,’ अशी जाहीर मागणी केली. दुसरीकडे येथे मुंबईत फिल्मसिटीमध्ये एका टीव्ही शोचे चित्रीकरण सुरू असताना बघ्यांमधील मोहम्मद अकील मलिक या तरुणाने त्या रिअॅलिटी शोचे अँकरिंग करणा:या गौहर खान या अभिनेत्रीला ती मुस्लीम असूनही तोकडे कपडे घालून इस्लाम धर्माचे उल्लंघन करते म्हणून सर्वादेखत मारहाण केली. मुंबईतल्याच ‘नालंदा कॉलेज ऑफ लॉ’ने विद्यार्थिनींवर चार इंच बाह्यांचा ब्लाऊज आणि कमरेखाली सात इंच जाणारा टॉप घालण्याची सक्ती केल्याचे प्रकरणही ताजे आहे. चित्रपटाच्या माध्यमातून स्त्रीदेहाचा बाजार मांडला जातो म्हणून नवीन त्यागी अस्वस्थ झाले. गौहर खानच्या तोकडय़ा कपडय़ांनी धार्मिक भावना दुखावली गेल्याने मोहम्मद अकील मलिक या तरुणाचे पित्त खवळले. तर नालंदा कॉलेजने संस्कार, संस्कृतिजतन वगैरे या आस्थेतून असा निर्णय घेतला. काहीही असो, या तीन प्रकरणांना वेगवेगळे कंगोरे असले तरी समान धागा एकच आहे तो म्हणजे स्त्रीदेहाच्या प्रदर्शनाला असलेला विरोध.
स्त्रीदेहाचे प्रदर्शन असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या दृष्टिकोनाचा विचारही करायला हवा! आपण ज्या नजरेतून पाहू त्याच नजरेतून स्त्रीदेहाचे दर्शन आपल्याला होते. ज्यांना महिलांच्या भवितव्याच्या चिंतेने पछाडले आहे, त्यांना वाटते की सर्व मुलीबाळींनी अंगभर कपडे घालावेत. आखूड स्कर्ट, जीन्स अजिबात वापरू नयेत, ज्यामुळे आजूबाजूच्या पुरुषांचे चित्त विचलित होईल. आता पुरुषाचे चित्त विचलित होत असेल तर त्याचा दोष समोरच्या व्यक्तीला देणो किती संयुक्तिक आहे, हा ज्याचा त्यानेच विचार करायला हवा. अगदी त्याही पलीकडे जाऊन आपण समाज, संस्कृती आदी गोष्टींचा विचार करायचा म्हटले तरी हा मुद्दा काही आताच निर्माण झालेला नाही, त्यामुळे याविषयी अभिव्यक्त होताना किमान मर्यादांचे भान संबंधितांनी ठेवायला हवे. मारहाण करणो किंवा त्यांना वेश्या ठरवा, अशी मागणी करणो या गोष्टी कुठल्याही सभ्यतेच्या चौकटीत बसणा:या निश्चितच नाहीत.
स्त्रीदेहाच्या प्रदर्शनाचे समर्थन करण्याचा प्रश्न इथे येत नाही, पण तरीही या मानसिकतेचा विचार करायला हवा. स्त्रीला उपभोग्य वस्तू म्हणून बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्यात अमूलाग्र परिवर्तनाची आवश्यकता आहे. स्त्री-पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालली असली तरी महिलांनी पुरुषांच्या भावना सुखावणो ही अपेक्षा आजही शिल्लक आहेच. उदाहरणच बघायचे झाले तर आज जाहिरातींच्या माध्यमातून स्त्रीचे जे दर्शन घडवले जाते ते आपल्या समाजाची मानसिकता अधोरेखित करणारे आहे.
म्हणूनच स्त्रीला आरोपीच्या पिंज:यात उभे करताना र्सवकष विचार करण्याची आवश्यकता आहे. सभ्य-असभ्य याची सीमारेषा निश्चित करण्याचे काम आपली समाजव्यवस्था करत असते. त्याचेच प्रतिबिंब व्यक्तींच्या राहणीमानातून-वर्तनातून उमटते. म्हणूनच जेव्हा आपण यातील एखाद्या घटकाला दोष देत असतो तेव्हा या व्यवस्थेचाही विचार करायला हवा. 5क्च्या दशकात ‘ब्रrाचारी’ चित्रपटामध्ये मीनाक्षी शिरोडकर यांनी स्वीमिंग सूट घातला तेव्हा खूप खळबळ झाली. त्यानंतर पुढे त्यांच्याच नाती शिल्पा शिरोडकर, नम्रता शिरोडकर यांनी चित्रपटांमधून देहप्रदर्शन केले तेव्हा या दोघींवर ‘बोल्ड’पणाचे लेबल लागले! पेहरावाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर युरोपमध्ये एकेकाळी पुरुषांच्या कोटाचे वरचे बटण खुले असेल तर ते आक्षेपार्ह मानले जायचे, मात्र त्याचवेळी महिलांचे मिनी स्कर्ट स्वीकारार्ह होते.
स्त्रीने काय पोशाख घालावा, आपली कला कशी अभिव्यक्त करावी यावर बंधने असू शकत नाहीत. ही अपेक्षा आपल्या पुरोगामीपणाला शोभणारी नाही. एखाद्या नृत्यांगनेचा आविष्कार स्वच्छ नजरेने आणि रसिकतेने पाहता येणो हे निरोगी मानसिकतेचे लक्षण आहे. त्यामुळे आपणच आपली मानसिकता तपासून पाहायला हवी.
स्त्रीहिताच्या दृष्टीने कोणी विचार मांडत असेल तर ते स्वागतार्ह आहे, पण त्याला आधार असायला हवा, ते तितकेच प्रगल्भतेने मांडायला हवेत. याच पातळीवर आपण विचार केला तर त्यागी किंवा मोहम्मद अकील मलिक यांचे वक्तव्य आणि वर्तन वरकरणी जरी कोणाला फारसे गंभीर वाटले नसले तरी त्यामागची मानसिकता मात्र कुठल्याही संवेदनशील व्यक्तीला अस्वस्थ करणारी आहे.
स्त्री अन् सेक्स सेल्स
1उत्पादन विकण्यासाठी सुरु वातीला जाहिरातीत महिलांची एक इमेज कामी आली. त्यात पारंपरिक स्त्रीचे रूप जाहिरातीतून जपले गेले. मग त्यात नवरा आणि मुलांची काळजी घेणारी स्त्री उभी केली गेली.
2अशा इमेजमधून सगळीच प्रॉडक्ट विकणो कठीण झाले तेव्हा पुढची पायरी गाठली गेली. सेक्स अपिल ही गोष्ट जगभरातल्या उत्पादनांचे प्रमुख अंग झाले. सेक्सबद्दल प्रचंड कुतूहल असते, याच गृहीतकावर आजची जाहिरात उभी राहायला लागली आहे. जगभरातील नामांकित ब्रँड अशाच जाहिरातींच्या बळावर माठे झालेत.
3उत्पादनाविषयी कुतूहल निर्माण करण्याची ही पद्धत सेक्स सेल्स म्हणून ओळखली जाते. ग्राहकाला खेचून आणण्याची ही युक्ती महिलांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर परिणाम करू लागली आहे.
सुनील पाटोळे