तिजोरीची चावी कोणाच्या हाती

By admin | Published: May 24, 2015 01:08 AM2015-05-24T01:08:22+5:302015-05-24T01:08:22+5:30

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी येत्या २७ मे रोजी निवडणूक होत आहे. स्थायी समितीवरील सोळापैकी आठ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.

In whose hands the safe keys | तिजोरीची चावी कोणाच्या हाती

तिजोरीची चावी कोणाच्या हाती

Next

नवी मुंबई : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी येत्या २७ मे रोजी निवडणूक होत आहे. स्थायी समितीवरील सोळापैकी आठ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यानुसार सभापतीपदावर राष्ट्रवादीच्याच उमेदवाराची वर्णी लागेल हे निश्चित आहे. मात्र उमेदवार निवडीचे सर्व अधिकार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांच्याकडे असल्याने या पदासाठी ते कोणाच्या नावाला पसंती देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थायी समिती सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार २६ मे रोजी सकाळी ११ ते १ या वेळात नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ मे रोजी दुपारी १२ वाजता सभापतीपदासाठी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. महापालिकेत राष्ट्रवादीचे ५२, काँगे्रसचे १०, शिवसेनेचे ३८, भाजपाचे ६ आणि
५ अपक्ष असे संख्याबळ आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे आठ, शिवसेनेचे सहा व काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण सोळा जणांची स्थायी समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. आठ सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादीच्याच उमेदवाराची स्थायी समितीच्या सभापतीपदी वर्णी लागेल, हे निश्चित असल्याने महापालिकेच्या तिजोरीचा रखवालदार बनणण्यासाठी
पक्षात चुरस निर्माण झाली
आहे. (प्रतिनिधी)

च्राष्ट्रवादीकडून पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक तथा स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी यांचे नाव पुन्हा आघाडीवर आहे. तर नेत्रा शिर्के आणि अपर्णा गवते यांचीही नावे चर्चेत आहेत. नेत्रा शिर्के किंवा अपर्णा गवते यांच्यापैकी एकाला संधी दिल्यास स्थायी समितीच्या पहिल्या महिला सभापती बनण्याचा त्यांना मान मिळणार आहे.

च्असे असले तरी याचा सर्वस्वी निर्णय नाईक हेच घेणार आहेत. त्यामुळे ते महापालिकेच्या तिजोरीची चावी महिला सदस्याच्या हाती सोपवितात की सलग दोन वर्षे सभापतीपदाच्या कामकाजाचा अनुभव असणाऱ्या सुरेश कुलकर्णी यांना पुन्हा संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: In whose hands the safe keys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.