मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय कोणाचे?आगामी निवडणुकीत दोन्ही गटांचा अस्तित्वासाठी संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 11:51 AM2023-07-28T11:51:02+5:302023-07-28T11:51:11+5:30

आजही मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नेतृत्व मानणारा पक्षाचा कार्यकर्ता आणि माजी नगरसेवक असल्याचे  चित्र आहे.

Whose office of NCP party in Mumbai? Struggle for existence of both groups in upcoming elections | मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय कोणाचे?आगामी निवडणुकीत दोन्ही गटांचा अस्तित्वासाठी संघर्ष

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय कोणाचे?आगामी निवडणुकीत दोन्ही गटांचा अस्तित्वासाठी संघर्ष

googlenewsNext

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेत ३ जुलै रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर मुंबईतील पक्षाचे राजकीय समीकरण बदलले. मात्र, आजही मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नेतृत्व मानणारा पक्षाचा कार्यकर्ता आणि माजी नगरसेवक असल्याचे  चित्र आहे. तसे बघता मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तशी ताकद नाही. त्यामुळे आगामी महापालिका, विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही गटांना आपापले अस्तित्व टिकविण्यासाठी आणि नगरसेवकांचे संख्याबळ वाढविण्यासाठी कंबर कसावी लागणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या बैठका  राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील प्रमुख कार्यालय, राष्ट्रवादी भवन येथे होतात. तर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाची बैठक साधारण देवगिरी बंगल्यावर किंवा मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यावर असते. आजमितीस एका माजी नगरसेवकाने शिंदे गटात प्रवेश केला तर जोगेश्वरीच्या एका नगरसेविकेवर अपात्रतेची कारवाई झाल्याने त्यांचे सात माजी नगरसेवक आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भवनात संपूर्ण राज्यातून विविध सेलचे आलेले पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात दर आठवड्याला मीटिंग होतात. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, माजी गृहनिर्माण मंत्री  जितेंद्र आव्हाड, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई कार्याध्यक्षा राखी जाधव उपस्थित असतात. तर यशवंतराव चव्हाण भवनातही शरद पवार कार्यकर्त्यांना भेटतात, मार्गदर्शन करतात. 

- अजित रावराणे, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष,  शरद पवार गट
 उपमुख्यमंत्री अजित पवार गटाची बैठक मंत्रालयासमोरील मुंबईची बैठक ए-४ बंगल्यावर होते. आगामी पालिका, विधानसभा निवडणुकीची आम्ही तयारी सुरू केली आहे. परवाच आमची निवडक ६० प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मुंबईत ३६ तालुक्यात ३६ प्रभारी नेमले असून, त्यांना नियुक्तीपत्र देणार आहोत. तसेच आपल्या अध्यक्षतेखाली १० जणांची समन्वय समिती नेमली आहे.
    - नरेंद्र राणे, कार्याध्यक्ष, मुंबई, अजित पवार गट

Web Title: Whose office of NCP party in Mumbai? Struggle for existence of both groups in upcoming elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.