- सुनील पाटोळेभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी साबरमतीच्या काठावर एकमेकांच्या हातात हात घालून अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे भूमिपूजन केले. या वेळच्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ला यामुळे चालना मिळणार असल्याचे भाषण करत, बुलेट ट्रेनमुळे देशाला गती मिळणार असल्याचे म्हटले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काही जणांकडून स्वागत होत असतानाच त्याला जोरदार विरोधही होत आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्हीकडच्या भूमिका नेमक्या काय आहेत? बुलेट ट्रेनला विरोध का होतोय? हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न...जपानच्या सहकार्याने देशातील पहिल्यावहिल्या बुलेट ट्रेनच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच झाला आहे. त्यानंतर अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाची चर्चा आता सगळीकडेच सुरू आहे. काही जण या प्रकल्पाचे स्वागत करत असून ही आपल्यासाठी मोठी अभिमानाची बाब असल्याचा त्यांचा सूर आहे. तर त्याचवेळी या प्रकल्पावर बरेच जण सडकून टीका करत आहेत. अर्थातच यातल्या प्रत्येकाची यामागे काही वैचारिक भूमिका आहे. म्हणूनच सर्वसमावेशक आणि व्यापक भूमिकेतून या प्रकल्पाच्या निमित्ताने समोर येणाºया मुद्द्यांचा विचार करायला हवा. बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पाची गरज आहे अशी एक बाजू असली तरी या प्रकल्पाला विरोध म्हणजे विकासाला विरोध असे नाही, ही दुसरी बाजूही समजून घ्यायला हवी. एकूणच आपल्या देशातील वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधांची स्थिती पाहता काही बाबींचे प्राधान्यक्रम ठरवायला हवेत. अशा निर्णयाच्या वेळी समाजातील कोणत्या वर्गाला केंद्रस्थानी ठेवले आहे, हे प्रतिबिंबित होत असते. बुलेट ट्रेन प्रकल्पावर समाजमाध्यमांमध्ये सध्या जी चर्चा सुरू आहे, त्यामागे हाच धागा आहे.बुलेट ट्रेनच्या या प्रकल्पासाठी जपान आपल्याला ८८ हजार कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे आणि हे कर्ज जवळपास आपल्याला मोफतच मिळत असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मोदींचे हे विधान बाळबोध असल्याची प्रतिक्रिया अर्थतज्ज्ञ गिरीश जखोटिया यांनी दिली आहे. ते म्हणाले, कोणताही मित्र अकारण आर्थिक औदार्य दाखवत नाही. मुळात आपण या प्रकल्पासाठी जपानचीच निवड का केली आहे, हा प्रश्न आहे. इतर देशांकडेही यासाठीचे प्रगत तंत्रज्ञान आहे. त्याचा खर्च जपानच्या तुलनेत ४० टक्क्यांनी कमी झाला असता. जपानने मुद्दलातच व्याज वसूल केले आहे. त्यामुळे या प्रकल्पात सुरुवातीलाच पारदर्शकतेचा अभाव दिसतो आहे. दुसरे म्हणजे जपानने आपल्याला आर्थिक मदत करत खूप उपकार केले आहेत, या भ्रमात कोणी राहू नये. त्यासाठी जपानची अर्थव्यवस्था समजून घेतली पाहिजे. तिथल्या अनेक बँका बिनव्याजी पैसे देतात. जपानकडे खूप सारा निधी पडून आहे. त्यांनी तो पैसा भारतात गुंतवून चलाखी केली आहे. त्यापुढे जाऊन हाच आपला मित्र या प्रकल्पाची उभारणी करणार आहे. त्यामुळे कर्जही त्यांचे आणि कामही त्यांना असा हा व्यवहार आहे. परकीय चलनाच्या अनिश्चिततेचा विचार केला व उद्या येन प्रभावी ठरल्यास आपल्याला याची मोठी आर्थिक किंमत मोजावी लागेल. दुसरा मुद्दा रोजगार उपलब्ध होण्याचा आहे. तोही तसाच पोकळ आहे. हारोजगार किती वर्षांसाठी उपलब्ध होईल हे महत्त्वाचे आहे.बुलेट ट्रेन यासारख्या प्रकल्पाची घाई करण्याची गरज नाही. आपण प्राधान्यक्रम ठरवायला हवेत. आपण फार मोठ्या वर्गासाठी असलेल्या रेल्वे, रस्ते वाहतुकीच्या समस्येकडे, त्याच्या देखभालीकडे गृहीत धरून दुर्लक्ष करीत आहोत. निधीच्या कमतरतेमुळे तडजोड करत आहोत. अशा वेळी बुलेट ट्रेनने आपण नेमके काय साध्य करणार आहोत याचे उत्तर शोधायला हवे, अशी भूमिका वाहतूकतज्ज्ञ सुधीर बदामे यांनी मांडली आहे. ते म्हणाले की, विमान प्रवासापेक्षा या ट्रेनचा प्रवास महागडा ठरणार असेल तर आर्थिकदृष्ट्या ही सेवा व्यवहार्य कशी ठरेल? आज कम्युनिकेशनची इतकी साधने उपलब्ध असताना एका जागेवरून दुसºया जागी इतक्या जलदगतीने पोहोचण्याची गरज आहे का? आणि असेल तर त्यासाठी इतका भरमसाट खर्च करावा का? या प्रकल्पाचे स्वागत इतक्यासाठीच करता येणार नाही की जोपर्यंत आपण तंत्रज्ञान विकसित करत नाही, तोपर्यंत दुसºयावर अवलंबून राहण्याने आपली लूटच होणार आहे. म्हणूनच या बुलेट ट्रेनचा गाजावाजा करण्यात अर्थ नाही. मुंबईतील मोनोची स्थिती आपण पाहतच आहोत. केवळ बिनव्याजी पैसे मिळाले म्हणून हा प्रकल्प सुरू केला हा दृष्टिकोन असेल तर हे उपयोगाचे नाही. जेव्हा आपण हायवे बनवतो तेव्हा त्याचवेळी दुसºया बाजूला शहरांतर्गत रस्त्यांना लागून पादचाºयांसाठी फूटपाथ आहेत का, याचाही विचार करायला हवा. तो जसा आजही आपल्याकडे गांभीर्याने केला जात नाही. तसेच काहीसे बुलेट ट्रेनच्या बाबतीत झालेले आहे. या सेवेचे कौतुक होत असताना आपली इतर वाहतूक व्यवस्था कोणत्या अवस्थेत आहे याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.या बुलेट ट्रेन प्रकल्पावरील मतमतांतराचे सार पाहता एकूणच विकासाच्या दृष्टीने पुढचे पाऊल वगैरे या भूमिकेतून बुलेट ट्रेन प्रकल्प निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र त्याचवेळी आपल्याला वास्तवाचे भान सोडता येणार नाही. त्यामुळे आपली प्राथमिकता काय आहे, त्याला महत्त्व द्यायला हवे. रस्ते वाहतूक सुधारायला हवी. मोठ्या शहरांमध्ये मेट्रो, लोकलसारख्या सुविधा या लाइफलाइन आहेत. त्यात व्यवस्थितपणा आणण्यावर पैसा प्राधान्याने खर्च व्हायला हवा. जेव्हा हे मुद्दे लक्षात घेतले जातील तेव्हा अनेकांचा विरोध हा बुलेट ट्रेनला नाही तर तो प्राधान्यक्रमाला आहे, हे लक्षात येईल. अशा विषयामध्ये राजकारण व्हायला नको, तसे झाल्यास मुद्द्यांचे गांभीर्य कमी होते. मोदींच्या स्वप्नातील प्रकल्प म्हणून विरोध किंवा समर्थन अशी चर्चा होते तेव्हा विषय मूळ मुद्यांपासून भरकटतो. गुजरातमध्येच उद्घाटन का? महाराष्ट्राला काय फायदा? हे मुद्दे या विषयाच्या बाबतीत गौण असायला हवेत, आपण देशपातळीवर थोडे व्यापक स्वरूपात पाहायला हवे.क्षमताजपानमध्ये सध्या धावत असलेली ‘शिंकासेन ई - ५’ या बुलेट ट्रेनच्या धर्तीवर भारताच्या बुलेट ट्रेनची बांधणी असेल. सामान्य आणि विशेष असे १० कोच या ट्रेनमध्ये असतील. त्यातून ७५० प्रवासी प्रवास करतील.भविष्यात फायदाच होणारया बुलेट ट्रेन प्रकल्पावरील मतमतांतराचे सार पाहता एकूणच विकासाच्या दृष्टीने पुढचे पाऊल वगैरे या भूमिकेतून बुलेट ट्रेन प्रकल्प निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र त्याचवेळी आपल्याला वास्तवाचे भान सोडता येणार नाही. त्यामुळे आपली प्राथमिकता काय आहे, त्याला महत्त्व द्यायला हवे.बुलेट ट्रेन हा आपल्याकडचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्याचे आपण स्वागतच करायला हवे, अशी भूमिका रेल्वेतील निवृत्त अधिकारी आणि रेल्वे विषयातील अभ्यासक यशवंत जोगदेव यांनी मांडली आहे. ते म्हणाले की, रेल्वेत एवढी मोठी आर्थिक गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाला पहिल्यांदाच आपल्याकडे इतके महत्त्व दिले जात आहे, त्याचा भविष्यात आपल्याला फायदाच होणार आहे.आपण केवळ अहमदाबाद-मुंबई या एकाच मार्गावर थांबणार नाही, ही सुरुवात आहे. पुढे याचा विस्तार होत जाईल. ज्यांना परवडेल त्यांनी बुलेट ट्रेनने प्रवास केल्याने इतर वाहतूक व्यवस्थेवरचा ताण आपोआप हलका होणार आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. बुलेट ट्रेन आणि आपली सध्याची वाहतूक व्यवस्था यांना एकमेकांशी जोडून त्याची गल्लत केली जाऊ नये.दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत. बुलेट ट्रेनला विरोध करण्यापेक्षा ती शक्ती रखडलेले रेल्वे आणि रस्ते प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात वापरली तर त्यातून काही तरी सकारात्मक हाती लागेल.बुलेट प्रवास परवडणारा?बुलेट ट्रेन म्हटले की महाग प्रवास असा सर्वसाधारणपणे लोकांचा समज आहे. मात्र त्याला छेद देत बुलेट ट्रेन सर्वांना परवडेल, असा दावा करण्यात येत आहे.राजधानी एक्स्प्रेसच्या दुस-या श्रेणीतील वातानुकूलित डब्यात मिळणा-या सर्व सुविधा बुलेट ट्रेनमध्ये मिळणार आहेत.सुरुवातीच्या २४ बुलेट ट्रेन जपानमधून मागवल्या जाणार आहेत. दिवसाला या ट्रेनच्या ७० फे-या होतील. पुढे या ट्रेनला आणखी सहा डबे जोडून प्रवासी क्षमता १२५० केली जाईल.मुंबई-अहमदाबाद विमानाचे तिकीटदर हे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या तिकीटदरापेक्षा कमी आहेत. जर आपण विमानाचे बुकिंग ३ महिने अगोदर केले तर त्याहीपेक्षा कमी दरात तिकीट उपलब्ध होते. त्यामुळे बुलेट ट्रेनचा प्रवास हा महाग ठरतो. बुलेट ट्रेनमुळे देशात होणाºया अपघातांची संख्या वाढेल. अपघातामुळे मृत्यूंची संख्या वाढेल. आपल्या देशात ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाºया रेल्वेमुळे शेकडो अपघात होतात. अपघातांमध्ये हजारो लोकांचा मृत्यू होतो. ३०० ते ३५० किमी प्रतितास वेगाने धावणारी बुलेट ट्रेन धावू लागल्यावर ही संख्या वाढेल. हा प्रकल्प सुरू करण्याअगोदर शासनाने आपल्या देशातील लोकांची मानसिकता लक्षात घ्यावी.- गॉडफ्रे पिमेंटा,वाहतूक क्षेत्रातील जाणकारविकसनशील भारत आता विकसित होण्याच्या मार्गावर असल्याने भारतात बुलेट ट्रेनसारखे बदल होणे आवश्यक आहे. बुलेट ट्रेन देशाच्या इतिहासातील मोठा बदल ठरेल. विकसनशील देशात प्रथम पायाभूत सुविधा आणि मग प्रगती असे सूत्र असते. मात्र विकसित
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला विरोध का बरं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:47 AM