ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्यांना अटक का होत नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 01:06 PM2023-05-29T13:06:30+5:302023-05-29T13:06:50+5:30

चार महिन्यांत सायबर फसवणुकीचे ८०५ गुन्हे, ५४ गुन्ह्यांची उकल

Why are online fraudsters not arrested 805 cases of cyber fraud in four months 54 cases solved | ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्यांना अटक का होत नाही?

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्यांना अटक का होत नाही?

googlenewsNext

मुंबई : गेल्या चार महिन्यात सायबर फसवणुकीचे ८०५ गुन्हे नोंद झाले असून त्यापैकी अवघ्या ५४ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. आतापर्यंत ११४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे मनुष्यबळाचा अभाव असल्यानेही आरोपी पर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होताना दिसत आहे. 

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबई सायबर गुन्हे संबंधित एकूण १५६५ गुन्हे नोंद झाले आहे. यापैकी १५७ गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये सायबर फसवणुकीच्या ८०५ गुन्ह्यांचा समावेश आहे. यात, जॉब फ्रॉडचे ११६ तर फेक वेबसाईटचे ४५ सह विविध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

चार महिन्यांत ८०५ तक्रारी 
चार महिन्यात ८०५ तक्रारीची नोंद पोलिस दफ्तरी झाली. यामध्ये, कस्टम फसवणुकीचे २४, खरेदी ५६, जॉब ११६, गुंतवणुकीच्या ३३ गुन्ह्यांची नोंद आहे. दरम्यान, सायबर भामट्यांच्या जाळ्यात दिवसेंदिवस मोठ्या संख्येने नागरिक फसत आहेत. त्यामुळे संशय आल्यास तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

गोल्डन अवर्समुळे वाचले लाखो 
तक्रारदाराने तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर सायबर पथकाकडून संबंधित खाते तपासले जाते. ती रक्कम कुठल्या बँकेत वळती झाली याची माहिती घेतली जाते. त्यानुसार, ज्या खात्यात पैसे गेले त्या बँकेच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधून खात्याची माहिती घेत, खात्यात रक्कम शिल्लक असल्याचे समजताच तात्काळ फ्रीज्ड करण्यात येते. बँकेशी पाठपुरावा करून ती तक्रारदाराच्या खात्यात पुन्हा मिळवून देतात.

अवघ्या ५६ गुन्ह्यांची उकल
चार महिन्यात दाखल गुन्ह्यांपैकी अवघ्या ५६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. याबाबत सायबर पोलिस अधिक तपास करीत आहे.

मनुष्यबळाचा अभाव
सायबर पोलिस ठाण्यासह सायबर विभागात मनुष्यबळाचा अभाव आहे. परिणामी, गुन्ह्यांचा माग काढणे कठीण होते. बारीकसारीक गोष्टी तपासून गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात.

बँकेचे सहकार्य महत्त्वाचे
नागरिकांनी कुठलेही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी खातरजमा करणे गरजेचे आहे. फसवणूक झाल्यास तत्काळ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यास गोल्डन अवर्समुळे पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते, तसेच अशा गुन्ह्यांच्या तपासादरम्यान बँक सहकार्य ही महत्त्वाचे असते. मात्र, त्यासाठी पोलिसांना प्रचंड पाठपुरावा करावा लागतो.

Web Title: Why are online fraudsters not arrested 805 cases of cyber fraud in four months 54 cases solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.