Join us

"रेशन दुकांनवर ६ पैकी फक्त दोनच वस्तू उपलब्ध का?", शिवसेनेने केला सवाल

By मनोहर कुंभेजकर | Published: November 10, 2023 8:27 PM

विलेपार्ले -अंधेरीच्या 12 रेशन दुकानांवर शिवसेनेची धडक

मनोहर कुंभेजकर, मुंबई-काल पासून दिवाळी सुरू झाली.मात्र आनंदाचा शिधा फक्त पब्लिसिटी स्टंट साठी आहे का? असा सवाल करत शिवसेना नेते अँड.अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उबाठा विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डीचोलकर व महिला विभाग संघटक सौ रूपाली शिंदे यांच्यासह शिवसैनिक व महिला आघाडीने आज दुपारी विलेपार्ले पूर्व अंधेरी पूर्व येथील 12 रेशन दुकांनवर धडक देवून रिऍलिटी चेक केले.रेशन दुकांनवर फक्त दोनच वस्तू का उपलब्ध?असा सवाल शिवसेनेने यावेळी केला.तर यावेळी १०० रु मध्ये ६ वस्तूंपैकी फक्त चारच वस्तू उपलब्ध झाल्या नव्हत्या.त्यामुळे नागरिकांची निराशा झाली.

राज्य सरकारने दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा वितरित करणार असल्याची जोरदार प्रसिद्धी केली होती.१०० रु मध्ये ६ वस्तूंचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने वॆला. मात्र प्रत्यक्षात मात्र येथील रेशन दुकानावर मात्र आमच्या रिऍलिटी चेक मध्ये फक्त पोहे व डाळ उपलब्ध होती.तर अजूनही दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी १ किलो साखर १ पाम तेल,अर्धा किलो रवा,अर्धा किलो मैदा अजूनही उपलब्ध झाला नव्हता.अशी माहिती नितीन डीचोलकर यांनी लोकमतला दिली.सरकारच्या घोषणा फक्त हवेत असून खरी परिस्थिती वेगळीच असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी रेशन दुकानदारांना शिवसैनिकांनी जाब विचारला असता,दुकानदाराने ही मान्य केले आम्ही पैसे भरतो पण वस्तू आम्हाला मिळत नाही,सोमवारी उर्वरित चार वस्तू मिळतील अशी माहिती दुकानदारांनी दिल्याचे  डीचोलकर यांनी सांगितले. यावेळी शाखाप्रमुख प्रकाश सकपाळ. महिला शाखा संघटक अपर्णा उतेकर. आनंद पाठक. रितेश सोलंकी. दिलीप परब. जितेंद्र शिर्के व  नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :अंधेरीशिवसेना