डेल्टा प्लसची भीती का घालत आहात; त्याने प्रतिकारशक्ती कमी होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:06 AM2021-07-02T04:06:04+5:302021-07-02T04:06:04+5:30
आरोग्यविषयक अभ्यासक धनंजय केशव केळकर यांचे मत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कशाला त्या डेल्टा प्लसची भीती घालत आहात. ...
आरोग्यविषयक अभ्यासक धनंजय केशव केळकर यांचे मत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कशाला त्या डेल्टा प्लसची भीती घालत आहात. केरळमधील संशोधनात स्पष्ट झालेले आहे की, भीती वाढली की प्रतिकारशक्ती कमी होते. शुगर वाढली की प्रतिकारशक्ती कमी होते. शुगर कमी करायचा रामबाण उपाय म्हणजे चालणे आणि तुम्ही तेच बंद करत आहात. लोकांना मरण्याची भीती घालत आहात, असे आरोग्यविषयक अभ्यासक धनंजय केशव केळकर यांनी सांगितले.
डेल्टा प्लस आणि कोरोनाबाबत अधिक माहिती देताना धनंजय केशव केळकर म्हणाले की. सुरुवातीपासून आरोग्यमंत्री सांगत आहेत की. ८० टक्के लोकांना कोरोना होणार नाही म्हणून आणि उरलेल्या वीसपैकी पाच जणांना जास्त त्रास होणार आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे जाणवली, त्यापैकी पाचातल्या एकानेच चाचणी केली आहे. अशा रीतीने मुंबईतील वीस टक्के लोकांना कोरोना होऊन गेलेला आहे. टेस्ट न केलेले, इतर औषधे घेऊन लगेच बरेसुद्धा झालेले आहेत. मागच्या वर्षी जूनमध्ये मुंबईतील एकूण चाळीस टक्के लोकांना हर्ड इम्युनिटी आली होती. आता तो आकडा सत्तरवर गेला असेल. आता परत त्याचे टेस्टिंग चालू आहे. त्याचा अंदाज घेतला तर कळेलच की. पण नाही. पॉझिटिव्हिटी रेटच बघणार. अहो तो किती टेस्ट करतो याच्यावर अवलंबून आहे. लॉकडाऊनच्या काळात मागील दाराने सगळी दुकाने उघडी होती. तरीसुद्धा साथ आटोक्यात आलीच ना? त्यामुळे बदला आपले निकष आणि सोडवा जनतेला या त्रासातून.
एकच माणूस दोनदा मोजला
मुंबईसारख्या ठिकाणी लोकांचा सरकारी यंत्रणांवर भरवसा नाही. म्हणून बरेच लोक खासगीमध्ये परत टेस्ट करून घेतात. अशा रीतीने एकच माणूस दोनदा मोजला जातो.; पण बरा होताना एकच मोजला जातो. त्यामुळे सेंटरमध्ये रुग्ण कमी आणि कागदावर जास्त असा प्रकार होतो.
शहरांना वेठीस धरले जात आहे
इतक्या टेस्ट करा की पॉझिटिव्हिटी रेट पाचच्या खाली असेल, असे जग वागते आहे. तर येथे टेस्ट कमी करून पाच टक्क्यावर पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या शहरांना वेठीस धरले जात आहे. दोन कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत फक्त दहा हजारांखाली रुग्ण आहेत. किती टक्के. ०.०५ टक्के.
लसीची काय गरज?
जीवाणू, विषाणूला सौम्य करून शरीरात टोचणे म्हणजे लसीकरण. मग अख्खा विषाणू शरीरात शिरलेल्याला आणि बरा झालेल्याला लसीची काय गरज ?