मुंबई - महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठी मते मिळवण्यासाठी भाजप मुंबईत 'मराठी दांडिया' चे आयोजन करत आहे आणि दुसरीकडे तेच भाजप 'मांस उत्पादनांच्या जाहिरातींवर' बंदी घालण्याच्या आवाहनावर गप्प का आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो (Clyde Crasto) यांनी भाजपला ट्विटद्वारे केला आहे.
नवरात्रोत्सव काळात मराठी माणसांच्या मांसाहार करण्यावर व मांसाहारी जाहिरांतीवर बंदी घालावी म्हणून मागणी करण्यात येत आहे. त्या बंदीबाबत भाजप ब्र काढायला तयार नाही आणि दुसरीकडे मराठी दांडियाचे आयोजन करत आहे असेही क्लाईड क्रास्टो म्हणाले.
मराठी माणसांच्या मांसाहार करण्यावर आणि मांसाहारी उत्पादनावर बंदीच्या आवाहनाला भाजप पाठींबा देईल का? की मराठी माणसांना मांसाहारापासून दूर राहण्यास सांगेल असे खोचक सवालही क्लाईड क्रास्टो यांनी केले आहेत.