Join us

महिला मदत कक्षात पुरुषाकडे तक्रार का? त्यांच्या पुढे कसे व्यक्त व्हावे, असा सवाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 3:42 PM

पोलिस ठाण्यात येणाऱ्या महिलांचा तक्रारीला प्राधान्य देत यावे, यासाठी मुंबई पोलिसांचे मदत कक्ष महत्त्वाचे ठरते.

मुंबई :

पोलिस ठाण्यात येणाऱ्या महिलांचा तक्रारीला प्राधान्य देत यावे, यासाठी मुंबई पोलिसांचे मदत कक्ष महत्त्वाचे ठरते. काही ठिकाणी महिलांच्या तक्रारीसाठी पोलिस अधिकारी असल्याने महिलांनी त्यांच्यापुढे कसे व्यक्त व्हावे, असाही सूर काही ठिकाणी ऐकू आला. दुसरीकडे, महिलांसाठी निर्भया पथक २४ तास कार्यरत आहे.

मुंबईत दिवसाला हजारो तक्रारी पोलिस ठाण्यात येतात. पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाला तक्रार करणे सोयीस्कर व्हावे, यासाठी ९४ पोलिस ठाण्यांत स्वागत कक्ष उभारण्यात आले. यात प्रामुख्याने प्रशिक्षित महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.  हा कक्ष त्यांना त्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी सर्वप्रकारचे सहकार्य करेल, असे तत्कालीन पोलिस आयुक्तांनी सांगितले होते. मुंबईत काही ठिकाणी प्रशस्त असा कक्ष तयार करण्यात आला आहे. तेथे पोलिस मार्गदर्शन करतात. 

असे चालते कामकाज    पोलिस उपअधीक्षक (महिला अत्याचार प्रतिबंधक शाखा) हे महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेचे प्रभारी असतात. त्यांच्याअंतर्गत कक्ष १, कक्ष २ आणि महिला साहाय्य कक्ष यांचा समावेश होतो. कक्ष १ अंतर्गत बलात्कार, अपहरण, विनयभंगाचे प्रकार आणि महिलांवरील इतर गंभीर गुन्ह्यांचा तपास, तक्रार अर्जांची चौकशी आणि निपटारा केले जाते.     दुसरीकडे, कक्ष २ अंतर्गत  हुंडाबळी, हुंड्याच्या संबंधित आत्महत्या आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत उद्धवणारे अन्य गुन्हे, भारतीय दंडसंहितेच्या कलम ४९८ (अ) तसेच कौटुंबिक हिंसाचार व हुंड्याशी निगडित इतर गुन्ह्यांचा तपास केला जातो. 

क्यूआर कोडचा धाकमुंबईतल्या महिलांसंबंधित घडलेल्या गुह्याच्या आधारावर निर्जनस्थळी, धोकादायक अशी ठिकाणे निवडून त्या ठिकाणी क्यूआर कोड लावून गस्तीवर भर देण्यात आला आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात अशी ३० ते ४० ठिकाणे असून, त्यानुसार हे पथक साध्या गणवेशात छुप्या कॅमेऱ्यांसह टवाळखोरांवर लक्ष ठेवून राहतात. निर्भया पथकाचे विशेष लक्षअत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन मुंबईतील प्रत्येक  ठाण्यामध्ये महिला सुरक्षा कक्ष आणि निर्भया पथकांची स्थापना केली आहे.

 

टॅग्स :मुंबई पोलीस