‘भूलभुलैया’फेम निरुपम यांचा थयथयाट कशासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 04:58 AM2019-01-22T04:58:00+5:302019-01-22T04:58:04+5:30

वाढत्या प्रवासी संख्येमुळे कोलमडलेल्या उपनगरीय रेल्वेसेवेत सुधारणा करतानाच, मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बदल करणारा मेट्रो प्रकल्प जलदगतीने पूर्ण केला जात आहे.

Why did Nirupam get the theft of 'maze'? | ‘भूलभुलैया’फेम निरुपम यांचा थयथयाट कशासाठी?

‘भूलभुलैया’फेम निरुपम यांचा थयथयाट कशासाठी?

Next

मुंबई : वाढत्या प्रवासी संख्येमुळे कोलमडलेल्या उपनगरीय रेल्वेसेवेत सुधारणा करतानाच, मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बदल करणारा मेट्रो प्रकल्प जलदगतीने पूर्ण केला जात आहे. चांगल्या भविष्यासाठी आज होणारी अडचण सहन करण्याची भूमिका घेत, मुंबईकर या प्रकल्पाच्या पाठीशी आहेत. मात्र, निवडणुकांचे राजकारण करण्यासाठी ‘भूलभुलैया’फेम संजय निरुपम आरोपबाजी करत असल्याचा पलटवार मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी केला.
मेट्रो कामाबाबत निरुपम यांच्या आरोपांचा समाचार घेताना शेलार म्हणाले की, एलिव्हेटेड मेट्रोची कल्पना काँग्रेसचीच होती. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन होऊनही काम सुरू न केल्याबद्दल स्वत: निरुपम यांनी २०१२ साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठविले. तशी वेळ भाजपाचे सरकार आल्यानंतर आमच्यावर कधी आली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एमएमआरडीने अनेक अडचणींवर मात करीत कामाला वेग दिला आहे.
निरुपम आज एलिव्हेटेडला विरोध करत आहेत. मात्र, त्यांच्याच काँग्रेस सरकारने हा निर्णय घेतला, तेव्हा निरुपम कुठे होते. २००४ला मेट्रोचा मास्टर प्लॅन मंजूर झाला. त्यानंतर, काँग्रेस सरकारने १३ सप्टेंबर, २००५ला एमएमआरडीएच्या ११४व्या बैठकीत मंजुरी दिली. पुढे काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळातच याला मंजुरी मिळाली. ज्यावेळी जनसुनावणी झाली, काही नागरिक थेट मंत्रालयात तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. त्या वेळी सरकारने प्लॅन बदलावा, फेरविचार करावा, अशी मागणी निरुपम यांनी का केली नाही. आमदार अमित साटम, काही स्वयंसेवी संस्थांसह मी या मुद्द्यावर न्यायालयात गेलो, तेव्हाही निरुपम आले नाहीत. मग आताच पत्रकार परिषद घेत, मेट्रोला विरोध करण्यामागचा त्यांचा हेतू काय, असा सवाल शेलार यांनी केला.
>अंबानींना प्रकल्प न दिल्याचा राग
काँग्रेस सरकारने २००६ साली खासगीकरण करून, मेट्रोचे काम अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला दिले होते. भाजपाने सरकारने मात्र अन्य मार्ग सरकारच बनविणार असल्याची भूमिका घेतली. अंबानींना प्रकल्प दिला नाही, म्हणून तर निरुपम यांचा थयथयाट नाही ना, असा सवालही शेलार यांनी केला.

Web Title: Why did Nirupam get the theft of 'maze'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.