मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी दाखल एफआयआरमध्ये मुख्य संशयित आरोपी म्हणून संभाजी भिडे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवूनही त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल करीत उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागितले.जानेवारी २०१८ मध्ये कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी अनिता सावळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. बी.पी. धर्माधिकारी व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. भिडे यांचे नाव एफआयआरमध्ये असूनही त्यांच्यावर कारवाई न केल्याबद्दल न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. याबाबत सरकारकडून स्पष्टीकरण मागितले. आरोपीवर कारवाई का केली आली नाही, याचे स्पष्टीकरण प्रतिज्ञापत्रावर द्या, असे निर्देश सरकारला देत न्यायालयाने पुढील सुनावनी १६ एप्रिलला ठेवली.
‘संभाजी भिडे यांच्यावर कारवाई का केली नाही?’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 5:35 AM