Join us

जरांगे बंधूंमध्ये भांडण का झालं? भावाने बच्चू कडूंना सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 12:28 PM

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला आहे.

मुंबई- राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. तशी मराठा आरक्षणाची मागणी गेल्या काही वर्षांपासून सुरू होती, पण, आता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्यभरातील मराठा समाजाने जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. अंतरवली सराटी येथे जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलना ठिकाणी राज्यातील मंत्र्यांनी भेटी दिल्या, तसेच एक मोठी सभाही या ठिकाणी झाली. राज्यभरातील लाखो मराठा समाज यावेळी उपस्थित होते. यामुळे मनोज जरांगे पाटील राज्यभरात चर्चेत आले आहेत. जरांगे पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा उभा केला आहे, यासाठी त्यांनी स्वत:ची शेतीही विकल्याची माहिती समोर आली आहे. 

“मलाही वाटते की माझ्या हयातीत मुलाने CM व्हावे”; अजित दादांच्या आईने व्यक्त केली इच्छा

अंतरवली सराटी येथे आमदार बच्चू कडू यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी आमदार बच्चू कडू यांना मनोज जरांगे पाटील यांचे मोठे बंधू जगन्नाथ जरांगे पाटील यांची भेट झाली. या भेटीत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या कामाची माहिती दिली. या संभाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या संभाषणात मनोज जरांगे पाटील यांचे मोठे बंधू जगन्नाथ जरांगे पाटील सांगतात, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी स्वत:ची तीन एकर शेती विकली आहे. मागच्या काही वर्षापूर्वी ते राहिलेली २ एकर शेतीही विकायला तयार होते. यावेळी मी त्यांच्याशी भांडण काढले आणि शेती विकू दिली नाही. मी जमिन विकू देणार नाही म्हटल्यावर ते म्हणाले मी आत्महत्या करणार तुम्ही काय करणार? यावेळी आम्ही म्हणालो,आम्ही शेती करणार यावर पाटील काहीच म्हणाले नाही. त्यामुळे त्यांची दोन एकर शेती राहिली आहे, नाहीतर तीही त्यांनी विकली असती, असंही जगन्नाथ जरांगे पाटील म्हणाले. 

टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलमराठा आरक्षणबच्चू कडू