Join us

प्रवास न करणाऱ्यांना रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश का देता? - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 6:02 AM

आधीच अतिगर्दी असलेल्या मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर प्रवास न करणा-यांना प्रवेश का देता, असा सवाल उच्च न्यायालयाने रेल्वेला गुरुवारी केला.

मुंबई : आधीच अतिगर्दी असलेल्या मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर प्रवास न करणाºयांना प्रवेश का देता, असा सवाल उच्च न्यायालयाने रेल्वेला गुरुवारी केला.अनेकदा प्रवास करणाºया व्यक्तीला निरोप देण्यासाठी १० लोक स्टेशनवर येतात. ‘कुटुंबातील व्यक्ती प्रवास करणाºयाला लवकर परत ये, असे सांगतात. तर काही प्रवासी व्यक्तीला निरोप देण्यासाठी गाणेही गातात. रेल्वे दयाळू आहे. कोणालाही स्टेशनमध्ये प्रवेश देते. पण त्याची आवश्यकता काय?’ असे प्रभारी मुख्य न्या. नरेश पाटील व न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठाने म्हटले.जसे एल्फिन्स्टन स्टेशनवर रेल्वेने तत्काळ पादचारी पूल बांधला, तसेच अन्य कोणत्याही स्टेशनवर असा प्रकार घडू नये, यासाठी रेल्वेने आधीच पावले उचलावीत, अशी सूचना न्यायालयाने केली.स्टेशनवर अतिगर्दी होण्याचा प्रकार केवळ उपनगरीय रेल्वे स्टेशनचा नाही तर लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या स्टेशनवर थांबतात त्यांनाही ही समस्या भेडसावत आहे.या स्टेशन्सचे बांधकाम जीर्ण झाले आहे. लोकसंख्याही वाढतआहे. त्यातच भर म्हणजे महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोकया शहरात येतात. अस्तित्वात असलेल्या सुविधा कशा पुºया पडणार?’ असा प्रश्न न्यायालयाने केला.शहरातील रेल्वेवरील पूल आणि पादचारी पुलांचे आॅडिट करण्याचे काम सरकारने आयआयटीवर सोपविले असल्याची माहिती अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला दिली.धोकादायक पूल सील करारेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे व राज्य सरकार आवश्यक त्या उपाययोजना आखत आहे, अशी माहितीही सिंग यांनी न्यायालयाला दिली.रेल्वे आणि राज्य सरकार निर्णय घेताना व निधी देताना वेळेपूर्वीच पावले उचलतील, अशी आशा आम्हाला आहे. जर एखादा पूल धोकादायक असेल तर सील करा आणि लोकांना त्याचा वापर करून देऊ नका, असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :न्यायालयमुंबई