मुंबई : परिवहन विभागाने सुरू केलेल्या आंतरजिल्हा बससेवेमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. त्यात ई-पासचह कटकटही नाही. मात्र दुसरीकडे ज्यांच्याकडे स्वत:चे वाहन आहे, त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे. आमच्याकडे वाहन आहे हा आमचा गुन्हा आहे का? आमच्याच मागे ई-पासचे विघ्न कशाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.मुलुंडचे अनिल सॅम्युअल यांच्या म्हणण्यानुसार, शासनाने सर्वांसाठी समान नियम करणे गरजेचे आहे. स्वत:च्या वाहनाने कुटुंबासह जाताना आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास बंधनकारक करण्याचे कारण काय? उलट कुटुंब म्हटल्यावर जास्त काळजी घेऊनच प्रवास करणार आहोत. ई-पास बंद करणे गरजेचे आहे. किरण जाधव म्हणाले, गणेशोत्सवासाठी गावी जाण्यासाठी अखेरच्या टप्प्यात पर्याय उपलब्ध झाला. उशिरा गेल्याने तेथे पोहोचल्यानंतर क्वारंटाइनचे संकट होतेच. पर्यायी जाणेच रद्द केले.एका पोलीस अधिकाºयाने सांगितले, ई-पास बंद केल्यास विनाकारण भटकणारे वाढल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.>सरकारी बसच्या प्रवासात ई-पास का नको?दादरच्या रेश्मा देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने सर्वांसाठी समान नियम ठेवणे गरजेचे आहे. भांडुपचे निशांत पेडणेकर यांनीही प्रशासनाने ई-पासचा घाट बंद करणे गरजेचे असल्याचे मत मांडले. काही नागरिकांच्या मते सर्वांनाच ई-पास बंधनकारक करायला हवा. सरकारी बसमधून प्रवास करणाऱ्यांना ई-पास का नको? जे बसमधून जाणार त्यांना बाधा होणार नाही, हे कसे ठरवणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कुटुंबासह स्वत:च्या वाहनांनी जाणाऱ्यांना ई-पासचे विघ्न कशाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 4:11 AM