फ्लॅटमध्येही पेटवायच्या का चुली; गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:05 AM2021-09-03T04:05:50+5:302021-09-03T04:05:50+5:30

मुंबई : कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांच्या उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील आर्थिक गणिते बिघडली ...

Why even in a flat stove; Gas goes up by Rs 25 again | फ्लॅटमध्येही पेटवायच्या का चुली; गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला !

फ्लॅटमध्येही पेटवायच्या का चुली; गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला !

Next

मुंबई : कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांच्या उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील आर्थिक गणिते बिघडली आहेत. अशातच गॅस सिलिंडरचे दर महिन्याला वाढत आहेत. १ सप्टेंबरला गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा २५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींना महिन्याच्या बजेटची चिंता सतावू लागली आहे. याआधी महागाईची झळ गरीब कुटुंबांना बसत होती. मात्र आता दिवसेंदिवस महागाई शिखर गाठत असल्यामुळे मध्यम व उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांनादेखील महागाईची झळ बसू लागली आहे. सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्याला वाढत असल्यामुळे आता फ्लॅटमध्येसुद्धा चुली पेटवाव्या लागतील का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

दर महिन्याला नवा उच्चांक

दिनांक दरवाढ सिलिंडरचे दर

१ डिसेंबर - ५० ६४४

१ जानेवारी - ५० ६९४

१ फेब्रुवारी - २५ ७१९

१ मार्च - १०० ८१९

१ एप्रिल - ८०९

१ मे - - ८०९

१ जून - - ८०९

१ जुलै - २५ ८३४

१ ऑगस्ट - २५ ८५९

१ सप्टेंबर - २५ ८८४

सबसिडी किती मिळते भाऊ

आपल्या खात्यात दरमहा गॅस सिलिंडरची सबसिडी जमा होत आहे की नाही हे अनेकांना कळत नाही. कित्येक गरीब कुटुंबांकडे मोबाइल तसेच इंटरनेट सुविधेची कमी असल्यामुळे ही समस्या जाणवते. त्यात अनेकांचा एलपीजी आयडी त्यांच्या खात्याला जोडलेला नसल्याने सबसिडी येत नसल्याचे दिसून येत आहे.

व्यावसायिक सिलिंडरही महाग

घरगुती गॅस सिलिंडरसोबत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमतदेखील वाढली आहे. मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १६४९ झाली आहे. यामुळे आता हॉटेल, रेस्टॉरंट तसेच इतर व्यावसायिकांनादेखील महागाईचा सामना करावा लागत आहे.

महिन्याचे गणित कोलमडले

अनिता वारंगे - सरकार आम्हाला अच्छे दिन येतील असे म्हणाले होते. मात्र महागाईमुळे सामान्य माणूस खचत चालला आहे. गॅस सिलिंडरचे दर वाढत असल्याने आम्हाला पुन्हा एकदा चुली पेटवाव्या लागतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वत्सला राऊळ - वाढत्या महागाईमुळे कुठलाच खर्च परवडत नाही. इंधन, गॅस, भाज्या, कपडे सर्वांचेच दर वाढल्यामुळे आता नेमका संसार चालवायचा कसा, हा प्रश्न उपस्थित होत आहे. महिन्याचे गणित पडल्यामुळे शहरात राहणे परवडत नाही.

Web Title: Why even in a flat stove; Gas goes up by Rs 25 again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.