मुंबई : तापाचे इंजेक्शन दिल्यामुळे कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील 32 महिलांना अॅलर्जी झाली होती, तर सायरा शेख (47) या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. या महिलांना देण्यात आलेली सेफोटॅक्ङिाम आणि सेफ्ट्रीअॅक्झोन या प्रतिजैविकांचे नमुने अन्न व औषध प्रशासनाने तपासणीसाठी घेतले आहेत. दोन तपासण्यांच्या अहवालामध्ये औषधांमध्ये कोणताही दोष आढळलेला नाही, तिस:या तपासणीचा अहवाल येणो बाकी आहे. तर पालिकेचा अहवाल अजून प्रतीक्षेत आह़े यामुळे नक्की बाधा कशामुळे झाली, हा प्रश्न घटनेच्या 13 दिवसांनंतरही अनुत्तरितच आहे.
कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील महिला वॉर्डमध्ये ताप आलेल्या महिलांना सेफोटॅक्ङिाम आणि सेफ्ट्रीअॅक्झोन ही दोन इंजेक्शन्स 18 ऑगस्टला रात्री देण्यात आली होती. त्यानंतर या वॉर्डमधील 32 महिलांना थंडी, उलटय़ा असा त्रस सुरू झाला. इतक्या महिलांना एकदम त्रस सुरू झाल्यामुळे इंजेक्शनची अॅलर्जी झाल्याचे लक्षात आले. मग या महिलांना सायन आणि केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. भाभा रुग्णालयातील एकाच वॉर्डमध्ये इतक्यांना या प्रतिजैविकाचा त्रस का, कसा झाला याच्या चौकशीसाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचा अहवाल समितीने 1 सप्टेंबर रोजी वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालय संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी दिला आहे. मात्र हा अहवाल 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांना देण्यात येणार असून त्यानंतरच प्रसारमाध्यमांना सांगण्यात येणार आहे, असे डॉ. नागदा यांनी सांगितले. तसेच कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत भाभा रुग्णालयातील पाण्याची तपासणीही केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने या दोन प्रतिजैविकांच्या तपासण्या केल्या आहेत. त्यांचे अहवाल आले आहेत, मात्र औषधात दोष आढळला नाही. तिस:या तपासणीचा अहवाल दोन दिवसांत मिळेल. यानंतर कारण स्पष्ट होईल, असे प्रशासनाचे जॉइंट कमिशनर एस. टी. पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
संबंधित दोन्ही प्रतिजैविके याआधी त्या महिलांना दिली होती. त्याच बॅचमधली प्रतिजैविके इतर रुग्णालयांत पाठवण्यात आली आहेत. त्यापैकी कोणालाही त्रस झाला नाही. मग याच वॉर्डमधील महिलांना त्याचा का त्रस झाला, हा प्रश्न आहे. ती औषधे कशी ठेवली होती, त्यांचा डोस बरोबर दिला होता का हेही शोधणो गरजेचे आहे, असे अन्न, औषध प्रशासनाच्या अधिका:याचे म्हणणो आहे.