Join us

मुली गायब का होतात; त्यांचे पुढे काय होते?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 1:24 PM

गेल्या सात महिन्यांत अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याप्रकरणी ७१८ गुन्ह्यांची नोंद आहे.

मुंबई :

गेल्या सात महिन्यांत अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याप्रकरणी ७१८ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यापैकी ६५४ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. प्रेमप्रकरणाबरोबरच मोबाइल दिला नाही, अभ्यास करत नाही तसेच ओरडल्याच्या रागातही मुले घर सोडत असल्याच्या घटना समोर येत आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मायानगरी मुंबईत मुली आणि महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. बेपत्ता झालेली मुलगी अल्पवयीन असल्यास पोलिस लगेचच याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करतात. दर दिवशी अपहरणाच्या किमान तीन गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलिसांकडे होत आहे. या मुलींचा सामान्य तपासातून शोध घेण्यासोबतच ऑपरेशन मुस्कानसारखे उपक्रम राबवूनही पोलिस मुलींचा शोध घेतात. मात्र, मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, यावर ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

प्रेमप्रकरण अन् बरंच काहीबेपत्ता होणाऱ्या मुलींमध्ये प्रेमप्रकरणातून पळून जाणाऱ्या मुलींचे प्रमाण अधिक आहे. तसेच, काही प्रकरणात मुली सेक्स रॅकेट तसेच मानवी तस्करीच्या शिकार ठरताना दिसतात. राजस्थान, गुजरातसारख्या काही ठिकाणी अल्पवयीन मुलींसह लग्नासाठीही तस्करी होण्याच्या घटनाही पोलिसांच्या कारवाईतून वेळोवेळी समोर आले आहे.

रागाने घर सोडले अन् विकृताच्या जाळ्यात अडकला...रागाने घर सोडणे चेंबूरमधील अल्पवयीन मुलाला महागात पडले. वाटेत एकाची नजर त्याच्यावर पडली आणि त्याच्या विकृत वासनेचा तो शिकार झाल्याची घटना चेंबूरमध्ये घडली आहे. मुलाला विविध ठिकाणी नेत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे चार महिन्यांत तीन वेळा  अत्याचाराची माहिती समोर आली आहे.

समुपदेशन करत कुटुंबीयांच्या ताब्यातपोलिसांकडून मुलीचा शोध घेतल्यानंतर त्यांचे समुपदेशन करत त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येते. पोलिसांच्या निर्भया पथकाद्वारे हरवलेल्या अनेक मुलींचा शोध घेत आतापर्यंत त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई