Join us

'दाऊदच्या दोन बिल्डींग का तोडल्या नाहीत, दाऊदला तुम्ही घाबरता का?'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 4:32 PM

कंगना गेल्या 16 वर्षांपासून मुंबईत राहते, ती मुंबईकर आहे. कंगनाच्या त्या वक्तव्याशी आम्ही सहमत नव्हतो, पण ही मुंबई आमची आहे, मराठी माणसांची आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. तसेच, सर्वच जातीच्या, भाषांच्या लोकांचीही ही मुंबई आहे.

ठळक मुद्देकंगना गेल्या 16 वर्षांपासून मुंबईत राहते, ती मुंबईकर आहे. कंगनाच्या त्या वक्तव्याशी आम्ही सहमत नव्हतो, पण ही मुंबई आमची आहे, मराठी माणसांची आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. तसेच, सर्वच जातीच्या, भाषांच्या लोकांचीही ही मुंबई आहे

मुंबई - केंद्रीयमंत्री आणि रपाइंचे नेते रामदास आठवले यांनी अभिनेत्री कंगना राणौतला पाठिंबा देत तिच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली होती. विशेष म्हणजे कंगनाच्या कार्यालयाची बीएमसीकडून तोडफोड झाल्यानंतर आठवलेंनी घरी जाऊन कंगनाची भेट घेतली. यावेळी, कंगनाच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे आठवलेंनी सांगितले. त्यानंतर, आपण कंगनाला पाठिंबा का दिला, हेही आठवलेंनी स्पष्ट केले आहे. ती महिला असून मुंबईचा नागरिक, मंत्री म्हणून तिला पाठिंबा देण्याची जबाबदारी माझी असल्याचे आठवलेंनी म्हटले.  

कंगना गेल्या 16 वर्षांपासून मुंबईत राहते, ती मुंबईकर आहे. कंगनाच्या त्या वक्तव्याशी आम्ही सहमत नव्हतो, पण ही मुंबई आमची आहे, मराठी माणसांची आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. तसेच, सर्वच जातीच्या, भाषांच्या लोकांचीही ही मुंबई आहे. देशातील सर्वच नागरिकांना रोजगार देण्याचं काम मुंबईनं केलंय. मुंबईने चित्रपटसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. अमेरिकेपेक्षा आपल्या मुंबईत जागेचे रेट जास्त आहेत. कंगना ही महिला असून तिच्या संरक्षणासाठी तिला पाठिंबा देणं माझी नैतिक जबाबदारी असल्याचं केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं. 

कंगना दोन गोष्टी चुकीच्या बोलली पण तिच्याबद्दल हरामखोर, नॉटी, तुझं थोबाड फोडू असं शिवसेनेच्या नेत्यांकडून विधान केलं जात होत. त्यामुळेच, मुंबईचा नागरिक म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी आपण घेतली. मुंबईत कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. मुंबईत जवळपास 54 हजार इमारती अशाच अनधिकृत पद्धतीने आहेत. मग, या इमारतींवर कारवाई का नाही, कंगनावर सूड उगविण्याच्या हेतूने ही कारवाई करण्यात आली का?, दाऊदच्या दोन इमारती पाडण्याचे आदेश आहेत, त्या का नाही पाडल्या. दाऊदला तुम्ही घाबरता का, असेही रामदास आठवलेंनी म्हटले. 

शिवसेना पक्ष सूडबुद्धीने काम करतोय

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात  गढूळ वातावरण निर्माण झाले आहे. ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, तो सत्ताधारी शिवसेना पक्ष सूडबुद्धीने काम करीत आहे. निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा या ज्येष्ठ नागरिकावर शिवसेनेने जबरी हल्ला केला त्या हल्ल्याचे समर्थनही शिवसेनेने केले आहे. त्यामुळे या प्रकरणी योग्य ती कारवाई पोलिसांनी केली नाही. हल्लेखोर जामिनावर बाहेर आहेत, कंगना राणावतला ही अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे राज्यात वातावरण गढूळ झाले आहे. सूडबुद्धीने वागणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला बरखास्त केले पाहिजे अशी मागणी पुढे आली आहे. हे राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी या पुढे आलेल्या मागणीला माझा पाठिंबा असून त्यासाठी आपण केंद्रात प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी केले आहे. 

टॅग्स :मुंबईकंगना राणौतरामदास आठवलेशिवसेना