पालिका नवीन बस का घेत नाही? तीन महिने झाले पैशाचे नाव नाही; ‘बेस्ट’चीही अळीमिळी गुपचिळी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 12:37 PM2023-08-30T12:37:42+5:302023-08-30T12:37:53+5:30

‘बेस्ट’च्या कंत्राटी कामगारांचा रोजगार सुरक्षित नसल्याने त्यांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. त्यांना किमान वेतन व सोयीसुविधा देण्यात येत नसल्याने अधिकाधिक बसेस उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

Why is the municipality not buying a new bus? It's been three months and the money has no name; Even the 'best' is secretive | पालिका नवीन बस का घेत नाही? तीन महिने झाले पैशाचे नाव नाही; ‘बेस्ट’चीही अळीमिळी गुपचिळी

पालिका नवीन बस का घेत नाही? तीन महिने झाले पैशाचे नाव नाही; ‘बेस्ट’चीही अळीमिळी गुपचिळी

googlenewsNext

मुंबई : खासगीकरणाचे डोहाळे लागलेल्या बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांना पर्यायी बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्वमालकीच्या किमान ३ हजार ३३७ बसगाड्या ठेवणे अपेक्षित असतानाही यासाठी चालढकल सुरू आहे. या बसगाड्या तत्काळ उपलब्ध करून दिल्या नाहीत तर सध्या असलेली स्वमालकीच्या बसेसची संख्या १३८१ वरून आणखी कमी होऊन स्वस्त आणि किफायतशीर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुंबईकरांपुढील संकट अधिक गहिरे होणार आहे.

२२३७ नवीन गाड्यांच्या खरेदीसाठी पालिकेकडून बेस्टला ३४१९ कोटींचा निधीही मंजूर झाला. मात्र, जवळपास ३ महिने उलटूनही बेस्टच्या ताफ्यात एक ही नवीन बस दाखल न झाल्याने पालिका आणि बेस्ट प्रशासन आपल्या सेवेतील कंत्राटी कामगार आणि मुंबईकरांना वेठीस धरू पाहत असल्याची टीका होऊ लागली आहे.

‘बेस्ट’च्या कंत्राटी कामगारांचा रोजगार सुरक्षित नसल्याने त्यांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. त्यांना किमान वेतन व सोयीसुविधा देण्यात येत नसल्याने अधिकाधिक बसेस उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

जून २०१९ मध्ये तत्कालीन मान्यताप्राप्त बेस्ट वर्कर्स युनियन व महापालिका प्रशासन यांच्यातील समझोता करारानुसार बेस्ट उपक्रमात सुमारे ७७०० एवढ्या खासगी बसगाड्या चालवण्यास परवानगी देण्यात आली. तर बेस्टमध्ये स्वमालकीचा बसताफा ३३३७ एवढा राखण्यात येईल, असे निश्चित करण्यात आले. मात्र, या ताफ्यातील १६९६ गाड्या स्क्रॅप करण्यात आल्या आहेत.

या शिवाय चालू आर्थिक वर्षात बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीच्या आणखी ५४१ गाड्या स्क्रॅप केल्या जाणार आहेत. त्यामुळे ३१ मार्च २०२४ पर्यंत बेस्ट उपक्रमाच्या मालकीच्या फक्त ११०० बसगाड्या शिल्लक राहणार आहेत. यामुळे मुंबईकर प्रवाशांची मोठी गैरसोय तर होणार आहेच, शिवाय उपक्रमालाही फटका बसणार असल्याची माहिती बेस्ट 
युनियन वर्कर्सचे शशांक राव यांनी दिली आहे.

मुंबई : खासगीकरणाचे डोहाळे लागलेल्या बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांना पर्यायी बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्वमालकीच्या किमान ३ हजार ३३७ बसगाड्या ठेवणे अपेक्षित असतानाही यासाठी चालढकल सुरू आहे. या बसगाड्या तत्काळ उपलब्ध करून दिल्या नाहीत तर सध्या असलेली स्वमालकीच्या बसेसची संख्या १३८१ वरून आणखी कमी होऊन स्वस्त आणि किफायतशीर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुंबईकरांपुढील संकट अधिक गहिरे होणार आहे. २२३७ नवीन गाड्यांच्या खरेदीसाठी पालिकेकडून बेस्टला ३४१९ कोटींचा निधीही मंजूर झाला. मात्र, जवळपास ३ महिने उलटूनही बेस्टच्या ताफ्यात एक ही नवीन बस दाखल न झाल्याने पालिका आणि बेस्ट प्रशासन आपल्या सेवेतील कंत्राटी 
कामगार आणि मुंबईकरांना वेठीस धरू पाहत असल्याची टीका होऊ लागली आहे.
‘बेस्ट’च्या कंत्राटी कामगारांचा रोजगार सुरक्षित नसल्याने त्यांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. त्यांना किमान वेतन व सोयीसुविधा देण्यात येत नसल्याने अधिकाधिक बसेस उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
जून २०१९ मध्ये तत्कालीन मान्यताप्राप्त बेस्ट वर्कर्स युनियन व महापालिका प्रशासन यांच्यातील समझोता करारानुसार बेस्ट उपक्रमात सुमारे ७७०० एवढ्या खासगी बसगाड्या चालवण्यास परवानगी देण्यात आली. तर बेस्टमध्ये स्वमालकीचा बसताफा ३३३७ एवढा राखण्यात येईल, असे निश्चित करण्यात आले. मात्र, या ताफ्यातील १६९६ गाड्या स्क्रॅप करण्यात आल्या आहेत. या शिवाय चालू आर्थिक वर्षात बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीच्या आणखी ५४१ गाड्या स्क्रॅप केल्या जाणार आहेत. 
त्यामुळे ३१ मार्च २०२४ पर्यंत बेस्ट उपक्रमाच्या मालकीच्या फक्त ११०० बसगाड्या शिल्लक राहणार आहेत. यामुळे मुंबईकर प्रवाशांची मोठी गैरसोय तर होणार आहेच, शिवाय उपक्रमालाही फटका बसणार असल्याची माहिती बेस्ट 
युनियन वर्कर्सचे शशांक राव यांनी दिली आहे.

Web Title: Why is the municipality not buying a new bus? It's been three months and the money has no name; Even the 'best' is secretive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.