Join us

जगन्नाथाच्या रथयात्रेला परवानगी, पंढरीच्या वारीला का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 4:33 AM

५० हून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या अनेक दिंडींनी आपले सोहळे रद्द केले.

बाळासाहेब बोचरेमुंबई : देशभर कोरोनाचा प्रकोप असताना राज्यात संचारबंदीत शिथिलता आणि सर्व व्यवहार सुरू असताना तसेच पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेला परवानगी दिलेली असताना महाराष्ट्रात आषाढी वारीला परवानगी का नाही, असा सवाल वारकरी सांप्रदायातून विचारला जात आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेली चैत्री वारी सुनी सुनी झाली. त्यानंतर येणाऱ्या आषाढी वारीलाही परवानगी नाकारल्याने वारकऱ्यांमध्ये नाराजी आहे. सरकारने सात मानाच्या पालख्यांना, निवडक वारकºयांचा परवानगी दिली. त्यामुळे ५० हून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या अनेक दिंडींनी आपले सोहळे रद्द केले.अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांनी राज्य शासनाला निवेदन पाठवून वारीला परवानगी देण्याची उघडपणे मागणी केली आहे. त्याबाबत त्यांना वारीचा अट्टाहास का?, असे विचारले असता त्यांनी सांगितले की सर्वच व्यवहाराला परवानगी दिली असेल तर वारीबद्दल दुटप्पी भूमिका का? पंढरपूरमध्ये सात मानाच्या पालख्यांच्या पादुकांना परवानगी दिली आहे. त्यांच्यासोबत निवडक वारकरी येणार आहेत. मात्र इतरही लहान-मोठ्या पालखी आहेत.त्या ज्ञानोबा- तुकारामाचा जयघोष करत येतात, शंभर वर्षाहून अधिक वर्षाची त्यांची परंपरा आहे, त्यांची कुणी दखल घेतली नाही. त्यांनाही निवडक वारकºयांसह पंढरपूरला येण्याची परवानगी द्यायला हवी होती.>वर्षानुवर्षे वारी करणाºया इतर पालख्यांचा सरकारने अजिबात विचार केलेला नाही. आमची पालखी तर पंढरपूरपासून केवळ पन्नास किलोमीटर अंतरावरून निघणार होती. जिल्हा बदलीचाही प्रश्न नव्हता. तीन वारकºयांसह पादुका नेण्याची आमची मागणीही प्रशासनाने मान्य केली नाही.- अनंत महाराजबिडवे, तपकिरीमहाराज पालखी>यंदाची वारी चुकल्याचे दु:ख शब्दात वर्णन करू शकत नाही. पालखी प्रस्थानाच्या दिवशीच भावना उचंबळून आल्या आणि डोळ्यातून अश्रू ओघळले. आषाढीपर्यंत मनाची ही घालमेल कायम असून एकादशी दिवशीचा दिवस कसा असेल, हे आज तरी सांगता येत नाही.- भागवत महाराज चवरे, आजरेकर अंबेकर फड>यंदा पालखी सोहळ्यात सहभागी होता आले नाही म्हणून कोरोना या रोगाविषयी मनस्वी चीड निर्माण झाली. यंदाचा सुखसोहळा होत नसल्याने अक्षरश: रडू येते, गेल्या पन्नास वर्षांत मला असा अनुभव कधी आला नाही. त्यामुळे मनावर दडपण आले आहे. दररोज आज पालखी कुठे असेल, अशीच आठवण करत राहते.- चंदाताई तिवारी, भारुडकार

टॅग्स :पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरपंढरपूर वारी