Join us

प्रशिक्षित वैमानिकांची नेमणूक का नाही? एअर इंडिया, स्पाईस जेटला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 13:38 IST

आगामी १४ दिवसांत या मुद्यावर या दोन्ही कंपन्यांना खुलासा करण्याचे निर्देश या नोटीसद्वारे दिले आहेत.

मुंबई : ख्रिसमसच्या आठवड्यात दिल्लीमध्ये असलेल्या दाट धुक्यामुळे किमान ५८ विमाने दिल्लीत उतरू शकली नव्हती. त्यांना अन्यत्र वळविण्यात आले होते. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले होते. याचीच दखल घेत नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) एअर इंडिया आणि स्पाईस जेट या दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावली असून, कमी दृष्यमानतेत विमान उतरविणाऱ्या प्रशिक्षित वैमानिकांची नेमणूक का नाही? असा सवाल केला आहे. आगामी १४ दिवसांत या मुद्यावर या दोन्ही कंपन्यांना खुलासा करण्याचे निर्देश या नोटीसद्वारे दिले आहेत.

- ख्रिसमसच्या आठवड्यात २४ ते २८ डिसेंबर या कालावधीमध्ये दिल्ली शहर दाट धुक्यामध्ये हरवले होते. याचा परिणाम विमान सेवेवर झाला होता. यामुळे ५८ विमाने अन्यत्र वळविण्यात आली. ही विमाने एअर इंडिया आणि स्पाईस जेट या कंपन्यांची होती. वैमानिकांच्या शिक्षणामध्ये कमी दृष्यमानतेमध्ये देखील विमान उतरविण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. मात्र, जी ५८ विमाने अन्यत्र वळविण्यात आली होती, त्या विमानांचे वैमानिक त्यादृष्टीने पूर्णतः प्रशिक्षित नसल्याचे आढळल्यानंतर डीजीसीएने या दोन्ही कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

टॅग्स :एअर इंडियास्पाइस जेटविमान