सत्तेचा पेच का सुटला नाही? राज्यपाल आता काय करतील?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 06:33 AM2019-11-09T06:33:21+5:302019-11-09T06:33:26+5:30

सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करतील.

 Why not screw up? What will the governor do now? | सत्तेचा पेच का सुटला नाही? राज्यपाल आता काय करतील?

सत्तेचा पेच का सुटला नाही? राज्यपाल आता काय करतील?

Next

निवडणुकीत रमहायुतीला सत्तास्थापनेचा कौल दिला आहे. त्यानुसार महायुतीने सत्ता स्थापन करणे अपेक्षित होते. मात्र, शिवसेनेने अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासह समसमान सत्तावाटपाचा मुद्दा लावून धरला, भाजप मुख्यमंत्रिपद सोडण्यास राजी नाही. त्यामुळे निकाल लागून १५ दिवस उलटल्यानंतरही सत्तास्थापनेचा पेच सुटू शकला नाही.

राज्यपाल आता काय करतील?
सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करतील.
भाजपने नकार दिल्यास दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेला व त्यानंतर प्रसंगी संख्याबळाच्या क्रमानुसार इतर पक्षांना आमंत्रित करतील.
सत्तास्थापनेची तयारी दर्शविलेल्या पक्षाला किती आमदारांचा पाठिंबा आहे, याची खात्री राज्यपाल करून घेतली.
बहुमताची खात्री देणारी आकडेवारी जो पक्ष देईल त्यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करतील. अशी खात्री कोणीच देऊ न शकल्यास ल्यास राज्यपाल राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करतील. ‘आम्ही विधिमंडळातच बहुमत सिद्ध करू’ असे सांगून सत्तास्थापनेचा दावा करणाºया पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करायचे का, हा राज्यपालांचा अधिकार असतो.
फडणवीस यांना काही दिवस काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कायम ठेवले जाईल. दरम्यान कोणताही पक्ष बहुमत सिद्ध करू शकण्याच्या स्थितीत नाही असे लक्षात आल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट वा मध्यवधी निवडणुकीचाही पर्याय असेल.
 

Web Title:  Why not screw up? What will the governor do now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.