तुम्ही का बंदी घातली नाही, अमरावती हिंसाचारावरुन राऊतांचा फडणवीसांना प्रतिप्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 11:46 AM2021-11-22T11:46:21+5:302021-11-22T11:54:04+5:30

फडणवीस यांनी अमरावती शहरातील हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा केला आणि पीडितांची भेट घेतली. विभागीय आयुक्त कार्यालयात कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने प्रशासनाची बैठक घेतली.

Why you did not ban of Raza akadami, Sanjay Raut's reply to Devendra Fadnavis | तुम्ही का बंदी घातली नाही, अमरावती हिंसाचारावरुन राऊतांचा फडणवीसांना प्रतिप्रश्न

तुम्ही का बंदी घातली नाही, अमरावती हिंसाचारावरुन राऊतांचा फडणवीसांना प्रतिप्रश्न

Next
ठळक मुद्देफडणवीस यांनी अमरावती शहरातील हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा केला आणि पीडितांची भेट घेतली. विभागीय आयुक्त कार्यालयात कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने प्रशासनाची बैठक घेतली.

मुंबई - भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती शहराला भेट दिल्यानंतर येथे उफाळलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरुन राज्य सरकारवर जबरी टीका केली आहे. रझा अकादमीचे कुणासोबत मधुर संबंध आहेत, हे सर्वश्रुत आहे. भाजपने रझा अकादमीवर बंदी आणण्याची मागणी केल्यास काँग्रेसमध्ये कारवाईचे धाडसच नाही, असा घणाघातही फडणवीस यांनी रविवारी अमरावती दौऱ्यात केला. आता, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलंय.

फडणवीस यांनी अमरावती शहरातील हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा केला आणि पीडितांची भेट घेतली. विभागीय आयुक्त कार्यालयात कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने प्रशासनाची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारवर टिकास्त्र सोडले. फडणवीसांच्या या टीकेला आता शिवसेनेनं उत्तर दिलंय. महाविकास आघाडी सरकारमध्ये गट-तट पाहिले जात नाहीत. विरोधी पक्षनेते हे देखील मुख्यमंत्री होते. अमरावतीमध्ये दंगल कोणी पेटवली हे देशाला, जनतेला माहीत आहे. गुप्तचर यंत्रणेत काम करणारेही माणसंच आहेत. गुप्तचर यंत्रणा ही काश्मीर, चीन, गाझीपूर बॉर्डर व इतर ठिकाणी सुद्धा फेल झाली होती. अमरावतीतही फेल झाली, पण नंतर परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे राऊत यांनी म्हटले. 

बंदी, तुम्ही का घातली नाही 

फडणवीस यांच्या रझा अकादमीवर बंद घालण्यासंदर्भातील प्रश्नावरही राऊत यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं. तुम्ही सरकारमध्ये होतात, तेव्हा का नाही बंदी घातली, असा सवाल राऊत यांनी विचारला. तसेच, यासंदर्भात सरकार निर्णय घेईल, असेही त्यांनी म्हटलं. 

भाजप आगीत तेल ओततंय

केवळ हिंदूंवर गुन्ह दाखल होतात असं नाही. भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल झाले म्हणजे हिंदूंवर गुन्हे दाखल झाले असं म्हणता येत नाही. भाजप जे आंदोलन करतंय, ते राजकीय पोळी शेकण्यासाठी करत आहे. भाजपने आगीत तेल ओतण्याचे काम करू नये. आंदोलन करायचं तर अमरावतीत शांतता राखण्यासाठी करावं, असंही राऊत यांनी म्हटलं. 

रझा अकादमी कुणाची बी टीम - फडणवीस

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे रझा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांसोबतचे छायाचित्र प्रसारित केले जात आहे, तसे मुख्यमंत्र्यांचेही छायाचित्र आहे. ते का प्रसारित केले जात नाही, असा प्रश्न फडणवीस यांनी राज्य सरकारमधील मंत्र्याला केला. काँग्रेस सत्तेत असतानाच रझा अकादमीकडून मोर्चे काढले जातात. दोन समुदायांत दंगा होतो. पोलिसांवर हल्ले केले जातात. रझा अकादमी ही कुणाची ‘बी टीम’ आहे, हे जनतेला चांगले ठाऊक आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Web Title: Why you did not ban of Raza akadami, Sanjay Raut's reply to Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.