Join us

उपनगरीय स्थानके ‘वाय-फाय’मय

By admin | Published: September 13, 2016 5:18 AM

रेल्वे प्रवाशांना स्थानकांत मोबाइल फोनवर जलद आणि मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेच्या ११ स्थानकांवर नुकतीच वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली आहे.

मुंबई : रेल्वे प्रवाशांना स्थानकांत मोबाइल फोनवर जलद आणि मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेच्या ११ स्थानकांवर नुकतीच वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्याला भरघोस प्रतिसाद मिळत असून, ११ स्थानकांवर प्रत्येक आठवड्याला पाच लाख प्रवाशांकडून वाय-फायचा वापर केला जात आहे. मिळणारा प्रतिसाद पाहता, आणखी काही स्थानकांवर लवकरच वाय-फाय उपलब्ध केले जाईल, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली. गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यासाठी रेल्वे टेल आणि गुगलमार्फत वाय-फाय सुविधा पुरवण्यात येत आहे. २0१८ पर्यंत देशभरातील एकूण ४00 स्थानकांवर वाय-फाय सेवा देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. सुरुवातीला २०१६ पर्यंत १00 स्थानकांवर टप्प्याटप्प्याने वाय-फाय देण्यात येणार आहे. वाय-फाय सुविधेचा पहिला मान हा मुंबई सेंट्रल स्थानकाला मिळाला. या स्थानकात वाय-फाय सुविधा २0१६च्या जानेवारीत सुरू झाली. मात्र, त्यानंतर अन्य स्थानकांवर वाय-फाय सुविधा देण्यासाठी मुहूर्त मिळाला नव्हता. मध्य व पश्चिम रेल्वेच्या १५ उपनगरीय स्थानकांवर १५ आॅगस्टपर्यंत वाय-फाय देण्याचा निर्णय घेण्यात आला. २२ आॅगस्टपासून रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते अवघ्या १0 स्थानकांवर वाय-फाय सेवा देण्यात आली. सेवा सुरू केल्यानंतर त्याला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)मुंबई सेंट्रल येथे सर्वाधिक वापरपश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रलसह चर्चगेट, दादर, वांद्रे टर्मिनस, वांद्रे (लोकल), खार रोड आणि मध्य रेल्वेवरील एलटीटी, दादर, कल्याण, भायखळा, पनवेल येथे वाय-फाय सेवा देण्यात आली आहे. या सर्व स्थानकांवर मिळून प्रत्येक आठवड्याला चार ते पाच लाख प्रवासीवाय-फायचा वापर करत आहेत. मुंबई सेंट्रल स्थानकावर वाय-फायचा सर्वाधिक वापर होत आहे. त्यानंतर, कल्याण, दादर स्थानकांवर वाय-फायचा अधिक वापर होत आहे, अशी माहिती देण्यात आली. मुंबई सेंट्रलमध्ये तब्बल एक लाखांपेक्षा जास्त प्रवासी वाय-फायचा वापर करत आहेत.