महामार्गाचे रुंदीकरण रखडले

By admin | Published: April 22, 2015 10:47 PM2015-04-22T22:47:01+5:302015-04-22T22:47:01+5:30

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण गेली दोन-तीन वर्षांपासून रखडल्याने खोपोली शीळफाटा ते खोपोली गावादरम्यान चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.

The widening of the highway stopped | महामार्गाचे रुंदीकरण रखडले

महामार्गाचे रुंदीकरण रखडले

Next

अमोल पाटील, खालापूर
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण गेली दोन-तीन वर्षांपासून रखडल्याने खोपोली शीळफाटा ते खोपोली गावादरम्यान चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. अरुंद रस्त्यामुळे याठिकाणी वारंवार अपघात घडत असले तरी शासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेबरोबरच मुंबई-पुणे जुना राष्ट्रीय महामार्गावरून दररोज लाखो वाहनांची वर्दळ असते. खालापूर ते खोपोली बोरघाटादरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण अद्याप झालेच नाही. या मार्गावरून अवजड वाहने मोठ्या संख्येने धावत असल्याने लहान वाहनांना त्याचा फटका बसतो. खोपोली शीळफाटा ते खोपोली गाव याठिकाणी दिवसभर वाहतूक कोंडी असल्याने चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. यामार्गावर एकीकडे अरु ंद रस्ता तर दुसरीकडे रस्त्याच्या बाजूला साइडपट्टी नसल्याने ओव्हरटेक करण्याच्या नादात वाहने बाजूच्या गटारांमध्ये कलंडतात.
खोपोलीतून एखादे अवजड वाहन शीळफाट्याकडे जात असेल तर त्या वाहनांच्या पाठीमागे राहूनच वाहने चालवावी लागत आहेत. ओव्हरटेक करण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने अनेकदा चालकाला त्याचा फटका बसतो.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विभागाच्या गलथान कारभारामुळे आयआरबीने अद्याप रु ंदीकरण केले नसल्याचा आरोप चालकांकडून होत आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आमदार सुरेश लाड यांनी तत्कालीन बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना भेटून रस्त्याचे रु ंदीकरण करण्याचे पत्र दिले होते. नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर आणि नगरसेवक कुलदीपक शेंडे यांनीही एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंते यांना पत्र पाठवून याबाबत मागणी केली होती. त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महामार्गाची पाहणीही केली होती.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेचे रु ंदीकरण प्रस्तावित आहे. त्यातच नव्याने खालापूर ते लोणावळा सिंहगडपर्यंत बायपास रस्त्याचे प्रेझेन्टेशन अलीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. एकीकडे एक्स्प्रेसवेकडे लक्ष देणारे सरकार जुन्या राष्ट्रीय महामार्गाकडे लक्ष देणार का, असा प्रश्न वाहनचालकांकडून विचारण्यात येत आहे.

Web Title: The widening of the highway stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.