Join us

मुंबई-जेएनपीटी मार्गाचे रुंदीकरण अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 3:23 AM

मेअखेरीस काम पूर्ण होणार : अवजड वाहनांची कोंडी सुटणार

अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : जेएनपीटी मार्गावर अवजड वाहनांची होणारी कोंडी कमी करण्यासाठी रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी तब्बल ३ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. मेअखेर हे पूर्णत्वास येईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई-जेएनपीटी दरम्यान अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. जेएनपीटी बंदरात चार टर्मिनल्स आहेत. येथे लाखो कंटेनरद्वारे मालाची आयात निर्यात केली जाते. दिवसेंदिवस अवजड वाहनांचा आकडा वाढू लागला आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर रुंदीकरणाचे काम २०१६ मध्ये हाती घेण्यात आले. मुंबई-गोवा, मुंबई- पुणे, जेएनपीटी तसेच इतर ठिकाणी जाण्याकरिता याच मार्गाचा वापर केला जातो. कळंबोली ते डी पाँइंट ५ किलोमीटरचा रस्ता आहे. या ठिकाणी सहा लेन करण्यात आले आहेत. दोन्ही बाजूने सर्व्हिस रोडही तयार करण्यात आले आहेत. यासाठी जेएनपीटीकडून २६०० आणि केंद्र सरकारने ४०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.जेएनपीटी मार्ग प्रकाशाने उजळणारकळंबोली सर्कलपासून ते डी पॉइंटपर्यंत पथदिव्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे काम एजन्सीमार्फत करण्यात येत आहे. एप्रिल महिन्याअखेर हा महामार्ग उजळेल, असे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.जेएनपीटी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मोठा खांदा, नौपाडा येथील काही काम बाकी आहेत तेही दोन महिन्यांत पूर्ण होतील. यानंतर वाहतूककोंडी व अपघात रोखण्यास मदत होईल. याशिवाय कामाच्या दर्जाकडेही लक्ष पुरवले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाची पार्श्वभूमी पाहता हा रस्ता अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.- प्रशांत फेगडे,प्रकल्प संचालक,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणपुलाचे कामही अंतिम टप्प्यातजुन्या पुलांच्या रुंदीकरणाबरोबर किल्ला जंक्शन, जासई गाव, डी पॉइंट, पळस्पे फाटा या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत हेही काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.विनासिग्नलआठपदरी रस्तापळस्पे फाटा ते जेएनपीटी हा आठ लेनचा मार्ग तयार करण्यात आला आहे. या दरम्यान कुठेही सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली नाही. यामुळे या मार्गावर वाहने सुसाट धावतील. आठ लेन असल्याने वाहतूककोंडी नियंत्रणात येईल शिवाय वेळेचीही बचत होणार आहे.

टॅग्स :मुंबईरस्ते सुरक्षा