‘बेकायदा विवाह केलेल्या दुसऱ्या पत्नीस सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ नाही’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 06:14 AM2019-03-06T06:14:13+5:302019-03-06T06:14:21+5:30

सरकारी कर्मचाऱ्याचा पहिला विवाह संपुष्टात आला नसतानाही त्याने बेकायदेशीर दुसरा विवाह केला, तर त्याच्या मृत्युपश्चात त्याच्या दुस-या पत्नीला कुटुंब सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ मिळू शकत नाही, असा महत्त्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी दिला.

'Wife married for illegal sex does not have the benefit of retirement pension' | ‘बेकायदा विवाह केलेल्या दुसऱ्या पत्नीस सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ नाही’

‘बेकायदा विवाह केलेल्या दुसऱ्या पत्नीस सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ नाही’

googlenewsNext

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्याचा पहिला विवाह संपुष्टात आला नसतानाही त्याने बेकायदेशीर दुसरा विवाह केला, तर त्याच्या मृत्युपश्चात त्याच्या दुस-या पत्नीला कुटुंब सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ मिळू शकत नाही, असा महत्त्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी दिला.
संबंधित सरकारी कर्मचाºयाने इच्छापत्र करून, सेवानिवृत्ती वेतन दुसºया पत्नीच्या नावे केले असले, तरी कुटुंब सेवानिवृत्ती वेतन ही त्या कर्मचाºयाची संपत्ती नाही. कुटुंब सेवानिवृत्त वेतन हे कर्मचाºयाच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी असते आणि महाराष्ट्र नागरी सेवा (सेवानिवृत्त वेतन) नियम, १९८२ मधील नियम ११६ मध्ये ‘कुुटुंबा’ची व्याख्या देण्यात आली आहे. त्यामध्ये कर्मचाºयाचा पहिला विवाह कायदेशीररीत्या संपुष्टात आला नसतानाही त्याने दुसरा विवाह केल्यास, त्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे या नियमांतर्गत सरकारी कर्मचाºयाच्या दुसºया पत्नीला कुटुंब सेवानिवृत्त वेतनाचा लाभ मिळू शकत नाही, असा निर्णय न्या. संदीप शिंदे यांनी दिला.
सांगलीचे महालिंग रामचंद्र पाटील हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते. ५ मे, २००१ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी १२ मार्च, २००१ रोजी इच्छापत्र करून, त्यांची सर्व संपत्ती आणि कुटुंब सेवानिवृत्ती वेतन त्यांची दुसरी पत्नी कमल महालिंग पाटील यांच्या नावे केली. त्यानंतर, कुटुंब सेवानिवृत्ती वेतन अधिकृतपणे आपल्या नावे व्हावे, यासाठी कमल यांनी उपनिबंधक आणि जिल्हा परिषदेत धाव घेतली. रामलिंग यांचा पहिला विवाह कायदेशीर संपुष्टात आला नसतानाही त्यांनी बेकायदेशीरपणे दुसरा विवाह केल्याने, जिल्हा परिषदेने कमल यांना सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ देण्यास नकार दिला. या विरोधात त्यांनी दिवाणी न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांनीही दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे कमल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
महाराष्ट्र नागरी सेवा नियमांमध्ये कर्मचाºयाच्या एकापेक्षा अधिक विधवांना समान भागात कुटुंब सेवानिवृत्ती वेतन वाटून देण्याची तरतूद असल्याचा युक्तिवाद कमल यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. मात्र, न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद फेटाळताना म्हटले की, कायदेशीररीत्या पतीपासून वेगळ्या झालेल्या पत्नीला हा लाभ मिळू शकतो. मात्र, पहिला विवाह कायदेशीररीत्या संपुष्टात न येता, बेकायदेशीपणे दुसरा विवाह केलेल्या पत्नीला याचा लाभ मिळू शकत नाही, असे या नियमातून स्पष्ट होते.
>याचिका काढली निकाली
महाराष्ट्र नागरी सेवा (सेवा निवृत्ती वेतन) नियम मधील ११६व्या नियमानुसार, जर सरकारी कर्मचाºयाच्या पत्नीला/पतीला व्यभिचारामुळे न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला असला, तरी संबंधित व्यक्तीला सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत सरकारी कर्मचाºयाचा पहिला विवाह अस्तित्वात असतानाही, दुसरा विवाह केलेल्या कर्मचाºयाच्या दुसºया पत्नीला सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ कसा मिळू शकेल? असे म्हणत न्यायालयाने कमल यांची याचिका निकाली काढली.

Web Title: 'Wife married for illegal sex does not have the benefit of retirement pension'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.