बायकोने फोडले नवरोबाचे बिंग! जामिनावर सुटका करण्यास न्यायालयाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 03:37 AM2017-11-15T03:37:44+5:302017-11-15T03:38:17+5:30

विवाहसंस्थेच्या संकेतस्थळावरून विवाहेच्छुक तरुणींशी जवळीक साधून त्यांना लाखो रुपयांचा चुना लावणाºया नवरोबाचे बिंग बायकोनेच फोडले आहे.

 Wife nawarababa banged! Court rejects bail plea | बायकोने फोडले नवरोबाचे बिंग! जामिनावर सुटका करण्यास न्यायालयाचा नकार

बायकोने फोडले नवरोबाचे बिंग! जामिनावर सुटका करण्यास न्यायालयाचा नकार

Next

दीप्ती देशमुख
मुंबई : विवाहसंस्थेच्या संकेतस्थळावरून विवाहेच्छुक तरुणींशी जवळीक साधून त्यांना लाखो रुपयांचा चुना लावणाºया नवरोबाचे बिंग बायकोनेच फोडले आहे. तीन विवाहेच्छुक तरुणींना लाखो रुपयांचा गंडा घालणाºया आरोपीचा जामीन अर्ज गेल्याच आठवड्यात उच्च न्यायालयाने फेटाळला.
विवाहेच्छुक व आयुष्यात स्थिर होऊ पाहणाºया तिघींना अर्जदाराने फसविले आहे. त्याने केलेला गुन्हा समाजविरोधी आहे. त्यामुळे त्याची जामिनावर सुटका करू शकत नाही, असे म्हणत, न्या. ए. एम. बदर यांनी राहुल सिन्हा उर्फ तन्मय गोस्वामी याचा जामीन अर्ज फेटाळला.
ठाण्यामध्ये राहणारी रुचिता राऊत (तक्रारदाराचे बदललेले नाव) ही विवाहेच्छुक असल्याने तिने ‘शादी डॉट कॉम’ या विवाहसंस्थेत नाव नोंदविले. त्यानंतर, या विवाहसंस्थेच्या संकेतस्थळावरून तिचा संपर्क राहुलशी झाला. राहुलने तिला आपण भारतीय महसूल सेवेमध्ये असून, या ठिकाणी आपण उपायुक्त या पदावर काम करत असल्याचे सांगितले. त्याशिवाय आपले काम गोपनीय स्वरूपाचे असल्याने, कामासंबंधीची कोणतीच कागदपत्रे दाखवू शकत नाही, असेही रुचिताला सांगितले.
या दोघांची हळूहळू ओळख वाढत गेली. जवळीक निर्माण झाल्यावर या दोघांनीही डिसेंबर २०१६मध्ये विवाह करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान राहुलने रुचिताकडे घर घेण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. रुचिताचा राहुलवर विश्वास असल्याने तिने त्याला ही रक्कम दिली. मात्र, राहुल एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तिच्याकडून कारसाठीही ६८ हजार रुपये मागितले. अशा प्रकारे राहुलने रुचिताला एकूण १ लाख ६८ हजार रुपयांचा चुना लावला.
तक्रारीनुसार, विवाहापूर्वी राहुलच्या पत्नीचा रुचिताला फोन आला. तो आपण मोठे अधिकारी असल्याचे सांगून, अविवाहित तरुणी किंवा घटस्फोटीत विवाहेच्छुक महिलांशी जवळीक साधतो व त्यांच्याकडून पैसे लुबाडत असल्याची माहिती राहुलच्या पत्नीने रुचिताला दिली. यापूर्वी त्याने हैदराबादच्या तरुणीला फसविल्याची माहितीही रुचिताला दिली. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, राहुलने यापूर्वी तिघींना अशाच प्रकारे लुबाडले असून, त्यातील एकीला ३२ लाख २० हजार रुपयांना फसविले आहे.
कृत्य समाजविरोधी
आपण भारतीय महसूल विभागात मोठे अधिकारी असल्याचे भासवून अर्जदार अविवाहित तरुणी किंवा घटस्फोटीत विवाहेच्छुक महिलांना विवाहाचे आश्वासन देऊन त्यांना लुबाडायचा. त्याची जमिनावर सुटका केली, तर तो भविष्यात अशा प्रकारचा गुन्हा करणार नाही, याची खात्री नाही. या केसमधील पीडित असाहाय्य महिला आहेत, ज्या विवाहेच्छुक आहेत. त्याने केलेले कृत्य समाजविरोधी आहे, असे निरीक्षण नोंदवत, न्या. बदर यांनी राहुलची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला.

Web Title:  Wife nawarababa banged! Court rejects bail plea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.