- मनोहर कुंभेजकर
मुंबई - डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत पावलेल्या पती मंदार वेलणकरच्या न्यायासाठी गेली 20 महिने त्यांची पत्नी मीनाक्षी संघर्ष करत आहे.अंधेरी पश्चिम येथील स्टेशन लगत 113 बेड असलेल्या ब्रह्मकुमारी ग्लोबल हाॅस्पिटल आणि रिसर्च सेंन्टर( बीएसइएस हॉस्पिटल) यांच्याकडे विशेष म्हणजे नर्सिंग लायसन्सच नाही, तरी येथे 2002 पासून बेकायदेशीर शस्त्रक्रिया होत असल्याचा धक्कादायक ठपका शासनाच्या महिला व बालकांचे हक्क कल्याण समितीने ठेवला आहे.
कांदिवलीत येथील राहणा~या दिवंगत मदार वेलणकर याच्या मृत्यूस अंधेरी पश्चिम येथील पालिकेच्या अख्यारीतीत असलेले ब्रह्मकुमारी ग्लोबल हाॅस्पिटल आणि रिसर्च सेंन्टरच( बीएसइएस हॉस्पिटल) जबाबदार असल्याचा ठपका शासनाच्या महिला व बालकांचे हक्क कल्याण समितीने दिलेल्या त्यांच्या 2018-2019च्या अहवालात ठेवला आहे.समितीच्या अध्यक्षा व वर्सोवा विधान सभेच्या आमदार डॉ. लव्हेकर यांनी सदर अहवाल शासनाला अलीकडेच सादर केला आहे.लव्हेकर यांच्यासह एकूण 15 सदस्यीय समितीने या हॉस्पिटला भेट देऊन त्यांचा 304 पानी अहवाल तयार केला होता.
दिवंगत मंदार वेलणकर यांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या संबंधित रूग्णालयाचे डाॅक्टर अशोक मेहता, डाॅ.शशांक जोशी आणि संचालक वैद्यकिय अधिकारी यांच्यावर कारवाई करून मिनाक्षी वेलणकर यांना नुकसान भरपाई म्हणून ब्रह्मकुमारी रूग्णालयाकडून ठराविक रोख रक्कम व त्यात त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्च तसेच मिनाक्षी यांना महापालिकेच्या सेवेत एक विशेष बाब म्हणून नोकरी देण्यासंदर्भात पालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी समितीने आग्रहाची शिफारस केली आहे . त्या कार्यवाहीचा अहवाल समितीला अहवाल विधान मंडळास एका महिन्याच्या आत सादर करण्यात यावा, अशी शिफारस समितीने केली आहे अशी माहिती डॉ.भारती लव्हेकर यांनी लोकमतशी बोलतांना दिली
सदर अहवालात दिवंगत मंदार वेलणकर यांच्या पत्नी मीनाक्षी वेलणकर यांनी माझ्या पतीच्या मृत्यूस ब्रह्मकुमारी ग्लोबल हाॅस्पिटल आणि रिसर्च सेंन्टरच जबाबदार असल्याची तक्रार त्यांनी समिती अध्यक्षा डॉ.भारती लव्हेकर यांच्याकडे केली होती.त्या अनुषंगाने समितीने 23 मे 2018 रोजी या हॉस्पिटलला भेट दिली होती.या तक्रारीच्या आधारे या हॉस्पिटलकडे नर्सिंग होम नोंदणी प्रमाणपत्र नसतांना एखाद्या रुंग्णाची शस्त्रक्रिया करणे हे अक्षम्य असून दिवंगत मंदार वेलणकर यांच्यावर कोणत्या आधारावर सदर हॉस्पिटलने शस्त्रक्रिया केली असा सवाल या अहवालात समितीने केला आहे.येथील बेकायदेशीर शस्त्रक्रिया केल्या जातात त्याला या हॉस्पिटलमधील संचालक व वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक मेहता यांची मान्यता असते असे समितीला आढळून आले आहे.तसेच सदर हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जीकल शस्त्रक्रिया करता येत नाही असा फलक लावला असतांना कोणत्या आधारावर डॉ.शशांक जोशी यांनी मंदार वेलणकर यांच्यावर कोणत्या आधारावर सदर हॉस्पिटलने शस्त्रक्रिया केली असा सवाल देखिल समितीने केला आहे.मंदार वेलणकर यांच्यावर केलेले उपचार व शस्त्रक्रिया बेकायदेशीर असून त्यांच्या मृत्यूस सदर हॉस्पिटल व डॉ.अशोक मेहता व डॉ.शशांक जोशी हे जबाबदार असल्याचे समितीने अहवालात नमूद केले आहे..
डाॅक्टरांच्या व हॉस्पिटलच्या चुकीच्या उपचारामुळे पती मंदारचा मृृृत्यु झाल्याने त्या 20 महिन्यापासून त्यांच्या विरोधात लढा देत आहेत. त्यांना अद्यापही राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन यांच्याकडून कुठलाही न्याय मिळत नसल्याने, त्या सध्या मोठ्या मानसिक तणावात वावरत आहेत.
मयत मंदार वेलणकर यांच्या पत्नी मनिक्षा यांनी महिला, बाल हक्क आणि विकास समितीसमोर सदर विषयांची तक्रार केली होती. यांची दखल घेवून समितीच्या अध्यक्ष आमदार भारती लव्हेकर यांनी विधानसभा अधिवेशनात आवाज उठवून या प्रकरणात मयत मंदार वेलणकर यांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या संबंधित रूग्णालयाचे डाॅ.संचालक व वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक मेहता, डाॅ.शशांक जोशी यांच्यावर कडक कारवाई करून मिनाक्षी वेलणकर यांना नुकसान भरपाई म्हणून ब्रह्मकुमारी रूग्णालयाकडून ठराविक रोख रक्कम व त्यात त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्च द्यावा तसेच मिनाक्षी यांना मुंबई महानगर महापालिकेच्या सेवेत एक विशेष बाब म्हणून नोकरी देण्यासंदर्भात पालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी समितीने शिफारस केली आहे.सदर कार्यवाहीचा अहवाल समितीला अहवाल विधान मंडळास एका महिन्याच्या आत सादर करण्यात यावा, अशी शिफारस समितीने केली आहे
या प्रकरणी अधिक माहिती देतांना मीनाक्षी वेलणकर यांनी सांगितले की,आम्ही कांदिवली पूर्व येथील आर्य चाणक्य नगरात राहतो.माझे पती मंदार वेलणकर (४२) यांना सर्व्हयकल स्पाॅन्डयलायटिसचा त्रास होता. ४ नोव्हेंबर २०१७ रोजी पाठीच्या दुखण्याची तक्रार घेवून वेलणकर दाम्पत्य बीएसईएस हाॅस्पिटलमध्ये गेले होते. त्यादरम्यान मंदार यांना 25 ऑक्टोंबर २०१७ रोजी ब्रह्मकुमारी ग्लोबल हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी रूग्णालयातील डाॅ. शशांक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बीएसईएसमध्ये शास्रक्रिया झाल्यानंतर वेलणकर यांच्या शरीराचा डावा भाग लूळा पडला होता. त्यानंतर मंदार यांना सलग ३ दिवस व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्या डोक्याची कवटी काढावी लागेल, असा सल्ला डाॅ.शशांक जोशी यांनी मंदार यांच्या पती मिनाक्षी दिला होता. त्यानंतर शास्रक्रियेव्दारे मयत मंदार यांच्या डोक्याची कवटी काढण्यात आली होती. तीन दिवस मंदारला बॅंडेज गुडाळून ठेवले होते. त्यावेळी कुटुंबांपैकी कुणालाच नर्सिंग स्टाफने मंदार वेलणकर यांच्या वाॅर्डपर्यंत फिरकू दिले नसल्याची तक्रार मिनाक्षी वेलणकर यांनी महिला, बाल हक्क आणि विकास समिती अध्यक्षा आमदार भारती लव्हेकर यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत केली होती. याबाबत मीनाक्षी वेलणकर यांनी माझ्या पतीचा मृृृृत्यु हा हाॅस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे 4 नोव्हेंबर 2017 रोजी झाला होता असा आरोप लोकमतशी बोलतांना केला.मला न्याय मिळावा म्हणून गेल्या 20 महिन्यापासून मी संघर्ष करत आहे. माझ्या घरात कुणीही कमविता नाही. कुटुंबांतील दोन मुलांपैकी मोठा मुलगा हा गतीमंद आहे. तर दुसरा मुलगा शिक्षण घेत आहे. यामुळे नुकसान भरपाई म्हणून मला पालिकेत नोकरी आणि मुलांचे शिक्षणापर्यंत खर्च द्यावा. यासाठी महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांच्याकडे नुकतीच लेखी तक्रार केली असून मी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे अशी माहिती त्यांनी शेवटी दिली.